aurangabad crime news today, लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनच पत्नीसोबत खेळला भयंकर डाव, तीन मुलांनंतर DNA तपासताच पोलीस चक्रावले – shocking case of husband with psychopathic wife comes to light after dna test aurangabad news
औरंगाबाद : पत्नी मनोरुग्ण असल्याचा फायदा घेत एका बिल्डरने लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनच नववधूला बंदुकाच्या धाकावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. या अत्याचारानंतर जन्मलेल्या मुलाच्या डीएनएवरून हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी न्यायालयात आरोपी विरोधात दोषारोप पत्र दाखल केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंजूर खान मसूर खान वय -४५ (र. सिल्कमिल्क कंपाऊंड, पैठणरोड, औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी मंजूर खान याने पती मनोरुग्ण असल्याचा फायदा घेत लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून बंदुकीचा धाक दाखवत अत्याचार केले. त्या अत्याचारातून पीडीतेला तीन आपत्ती झाली. हा त्रास असह्य झाल्याने पीडितेने सातारा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. Beed: शिक्षक पतीला सहकारी शिक्षिकेसोबत सेक्स करताना पकडलं, बीडमध्ये पुढे काय झालं पाहाच…
गुन्हा दाखल झाल्यानंतर सातारा पोलीस योग्य तपास करत नसल्याचा आरोप करत पीडितेने न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. गुन्हेशाखेच्या तत्कालीन विविध निरीक्षकांनी याप्रकरणी डीएनए चाचणीची मागणी केल्यानंतर न्यायालयाने ती मान्य केली व डीएनए चाचणीचे आदेश दिले.
सुरुवातीला आरोपी मंजूर खान डीएनए चाचणी करण्यास टाळाटाळ करीत होता. त्यामुळे प्रकरणाला बराच उशीर झाला. दरम्यान आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर झालं. अनेक याचिका आरोपीने न्यायालयात दाखल केल्या. त्यानंतर डीएनए सँपल घेतल्यानंतर तपासणीचा अहवाल आला आणि त्या अहवालामध्ये तिसरा अपत्य हा मंजूर खानचा असल्याचं समोर आलं. यानंतर आता गुन्हे शाखेने या प्रकरणाचा दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. मात्र, या धक्कादायक घटनेमुळे औरंगाबादेत एकच खळबळ उडाली आहे.