पेनसिल्व्हेनिया : प्राण्यांवर प्रेम करणे ही चांगली गोष्ट आहे, त्यांची काळजी घेणे देखील चांगले आहे. पण काळजी घेणे आणि स्वतःच्या घरात निवारा देणे यात फरक आहे. बरेच लोक घरात पाळीव प्राणी ठेवतात परंतु कोणता प्राणी पाळीव प्राणी आहे आणि कोणता नाही यात फरक समजणे फार महत्वाचं आहे. एका व्यक्तीला सापांबद्दल खूप वेड होते. त्या व्यक्तिने आपल्या घरात एका अजगराला ठेवले होते. मात्र, त्याच अजगराने त्याच्या प्रवृत्तीनुसार मालकाचा गळा दाबून त्याला ठार केले.

अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथील रहिवासी असलेल्या इलियट सेल्समनची त्याच्याच पाळीव अजगराने हत्या केली. इलियट, ज्याला सापांच्या प्रजातीचे खूप वेड आहे असं म्हटले जातं. त्यांनी अनेक वर्षांपूर्वी एका अजगराला आपल्या घरात आसरा दिला होता. पाळीव अजगराने २७ वर्षीय इलियटच्या गळ्याला अचानक वेढा घातला. त्यापासून सुटका करण्यासाठी पोलिसांना अजगराला गोळ्या घालाव्या लागल्या. त्यानंतपर इलियटला रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान ४ दिवसांनी इलियटचा मृत्यू झाला.

Shivsena: उदय सामंतांनी ऐनवेळी गाडीचा मार्ग बदलला अन् ‘गुगल मॅप’ने घात केला
सापांबद्दल होत खूप प्रेम

लोकवस्तीच्या परिसरातून सापांची सुटका करून स्वत:कडे आणणे हा इलियटचा छंद होता. मिळालेल्या माहितीनुसार, इलियटने घरात बोआ कंस्ट्रक्टर किंवा तत्सम प्रजातीचा साप ठेवला होता. ज्याने इलियटचा गळा दाबला आणि परिणामी त्याला ‘अॅनॉक्सिक ब्रेन इंज्युरी’ झाली आणि मेंदूला इजा झाली. ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ लागला. शेवटी ४ दिवसांनी इलियटचा उपचारादरम्यान रूग्णालयात मृत्यू झाला.

ज्याला जिव लावला त्यानेच जिव घेतला

इलियटच्या गळ्यात अजगराने वेढा घातल्याची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. इलियट बेशुद्ध झाला होता. अजगराने त्याच्या गळ्यात जबरदस्त विळखा घातला होता. त्याच्या सुटकेसाठी पोलिसांना खूप प्रयत्न करावे लागले. अजगराची लांबी १८ फूट होती. त्यामुळे त्याला गळ्यातून काढण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागला. शेवटी हार पत्करून पोलिसांना अजगराला गोळ्या घालाव्या लागल्या, त्यानंतर तो गळ्यापासून वेगळा केला. २०१६ मध्ये एका विद्यापीठात इलियटच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या अजगराशी त्याची मैत्री होती. कारण इलियटला सापांबद्दल प्रचंड हौस होती म्हणून त्याने त्याला आपल्या घरात वाढवले होते.

बंडखोरांची स्वतःहून मूळ पक्षाला सोडचिठ्ठी, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद, दोन पर्याय सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here