काम मिळेल या आशेनं तरुणी अर्जुन सोबत २० व्या मजल्यावरील फ्लॅटवर गेली. घर मालकानं तिला अर्ध्या तासानं येण्यास सांगितलं. त्यानंतर तरुणी टेरेसवर पोहोचली. त्यावेळी अर्जुन तिच्या मागून आला. त्यानं तिचा गळा धरला आणि तिला खाली फेकलं. तरुणीचं नशीब बलवत्तर म्हणून तिचा जीव वाचला. सुदैवानं ती १८ व्या मजल्यावर असलेल्या खिडकीच्या छतावर पडली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान इमारतीत पोहोचले. त्यांनी महिलेला खिडकीतून सुरक्षित बाहेर काढलं. महिलेच्या गळ्याला, डोक्याला आणि हाताला इजा झाली होती. तिला उपचारांसाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अर्जुन सिंहविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
तरुणीसोबत आपले संबंध होते. त्यावरून ती ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप अर्जुन सिंहनं केला. ब्लॅकमेलिंगला कंटाळून महिलेचा काटा काढण्याचं ठरवलं. त्यामुळेच तिला टेरेसवरून ढकललं, असं आरोपीनं पोलिसांना सांगितलं. मात्र पीडित महिलेनं आपले सुरक्षा रक्षकाशी कोणतेही संबंध नव्हते, असा जबाब पोलिसांना दिला.