वॉशिंग्टन : सूर्याच्या वायुमंडळात एक छिद्र पडल्यामुळे आज सौर वादळ पृथ्वीवर धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे. सूर्याच्या वायुमंडळातील या छिद्रातून वायूजन्य पदार्थ बाहेर सोडले जात आहेत, ज्यामुळे जोरदार वाहणाऱ्या सौर वाऱ्यांसह G1- सौर वादळ तयार झालं आहे. हा वायूजन्य पदार्थ सूर्याच्या वायुमंडळातील दक्षिणेकडील छिद्रातून वाहत आहे. नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन (NOAA) नुसार, आज एक लहान G1 श्रेणीचं भूचुंबकीय वादळ पृथ्वीवर येण्याची शक्यता आहे. यासंबंधी एनओएएने इशारा दिला आहे.

जी-१ श्रेणीतले हे वादळे सर्वसाधारणपणे कमीत-कमी नुकसान करेल असा अंदाज वर्तवला जात असला तरी याचा जनजीवनावर परिणाम होऊ शकतो. शास्त्रज्ञांनी G1 ते G5 दरम्यान अशा सौर वादळांचं वर्गीकरण केलं आहे. जी-5 श्रेणीतील वादळ सर्वात शक्तिशाली आणि विनाशकारी मानलं जातं. तर G-1 वादळामुळे फारसं नुकसान होत नसलं तरी त्यामुळे अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडीत होऊ शकतो. यामुळे इतर उपग्रहांचंही नुकसान होऊ शकतं.

पृथ्वी फिरत नाहीय धावतेय; २४ तासातला वेग पाहून शास्त्रज्ञांची झोप उडाली, पाहा आता काय होणार!
कसं पाहू शकता सौर वादळ ?
शास्त्रज्ञांच्या मते, या सौर वादळामुळे कॅनडा आणि अलास्काच्या आकाशात अरोरा (ध्रुवीय प्रकाश) दिसण्याची शक्यता आहे. अरोरा हा एक आकर्षक प्रकाश असतो, जो सौर वादळांमुळे निर्माण होतो. या वादळानंतर दर ११ वर्षांनी सूर्यावर उद्रेक होतो. भारतीय वेळेनुसार सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास सूर्यावर हा जोरदार स्फोट झाला, त्यामुळे आता नवीन सौर वादळ निर्माण झालं आहे.

Patra Chawl Scam: संजय राऊतांनी ३ कोटी कॅश देऊन खरेदी केले ९ फ्लॅट्स, ईडीच्या आरोपाने खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here