सांगली : चुकीच्या घडलेल्या घटनांचे घड्याळ आता उलट फिरवणार आहे, का? असा सवाल उपस्थित करत राज्यातल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या सुप्रीम कोर्टाच्या चालढकलीवर ज्येष्ठ काँग्रेस नेते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टात आतापर्यंत ३ वेळा सुनावणी झाल्या. पण सुप्रीम कोर्टाने तारीख पें तारीखचा सिलसिला आजही कायम ठेवत उद्या (गुरुवारी) या प्रकरणाची सुनावणी ठेवली आहे. याच विषयी पृथ्वीराज चव्हाण यांना विचारला असता सुप्रीम कोर्टाचं काय चाललंय? अशी खंत व्यक्त करताना देशात एककलमी हुकुमशाही कारभार सुरू असल्याची टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ते सांगलीमध्ये बोलत होते.

राज्यातल्या सत्ता संघर्षातील सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सुनावणीनंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “सुप्रीम कोर्टामध्ये आज काहीतरी निकाल होईल हे अपेक्षित होतं. पण फार लांबलचक आणि गुंतागुंतीचा हा सगळा मामला आहे. आम्हाला आश्चर्य वाटतंय सुप्रीम कोर्टाच्या व्हेकेशन बेंचच्या दोन न्यायाधीशांनी जो निर्णय दिला, तो आश्चर्यकारक होता. खरंतर निलंबनाची कारवाई प्रलंबित असताना मुख्यमंत्र्यांना शपथ देणे हेच चुकीचं होतं. त्यानंतर अध्यक्षांची निवड देखील होऊन गेलेली आहे. आता या घड्याळाचे काटे सुप्रीम कोर्ट उलटे फिरवणार आहे का? त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे काय चाललंय हे कळत नाही”.

गुलाबाचे झाड माझ्याकडे, पुन्हा नवीन गुलाब फुलविन : उद्धव ठाकरे
आमची आणि संपूर्ण देशातल्या जनतेची अपेक्षा आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घटनेत अभिप्रेत होते की न्यायदेवतेने कायद्याप्रमाणे न्याय दिला पाहिजे, पण सध्या तरी तसं होताना दिसत नाही. उद्या त्या ठिकाणी मोठं बेंच बसेल आणि ते कायद्याप्रमाणे न्याय देईल आणि यातून राज्यातली परिस्थिती स्थिरस्थावर होईल. यापुढे असा घोडा बाजार चालणार नाही, असे मत देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं.

मुंबई महापालिका निवडणुकीत धनुष्यबाण चिन्ह कुणाला? यासाठी…, हरिश साळवे यांचा कोर्टात युक्तिवाद
त्याचबरोबर देशामध्ये ईडीकडून ज्या पद्धतीने कारवाई सुरू आहे, ते पाहता देशांमध्ये एक पक्षाची हुकुमशाही सुरु आहे, विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे तसेच विरोधकांना संपवण्याचे काम सुरु आहे. भाजपला आपल्या समोर कुणी विरोधकच ठेवायचा नाही, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here