मुसळधार पावसामुळे घडली ही घटना
सोमवारी संध्याकाळपासून सुब्रमण्य येथे मुसळधार पाऊस पडत आहे. संध्याकाळी सातच्या सुमारास मोठा आवाज झाला आणि घराच्या व्हरांड्यात पुस्तक वाचत असलेली श्रुती आतून आवाज येत असल्याचा विचार करून घराच्या आत धावली. त्यानंतर त्यांनी सांगितलं की, ज्ञानश्रीही घराच्या आत धावत गेली आणि त्याचवेळी त्यांच्या घरावर डोंगराचा काही भाग कोसळला. घटनेच्या वेळी किचनमध्ये काम करणाऱ्या मुलींच्या आईला असं वाटलं की, मुली बाहेर असतील त्या या विचाराने बाहेर आल्या. रस्त्यात झाडे पडल्याने आणि पाण्यामुळे तात्काळ मदत कर्मचारी घटनास्थळी पोहोचू शकले नाहीत, असंही पोलिसांनी सांगितलं.
केरळमध्ये देखील पावसाचा हाहाकार
केरळमध्येही मुसळधार पाऊस पडत आहे. अतिवृष्टी आणि संभाव्य भूस्खलन, अचानक पूर आणि इतर आपत्ती लक्षात घेता, राज्य सरकारने केरळमध्ये ९५ मदत शिबिरे उघडली आहेत. जिथे २२९१ लोकांना हलवण्यात आले आहे. ३१ जुलैपासून अतिवृष्टीमुळे १२६ घरांचे नुकसान झाले असून त्यापैकी २७ घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. आयएमडीने जारी केलेला रेड अलर्ट आणि येत्या काही दिवसांत राज्यात अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले की, येत्या काही दिवसांत राज्यात खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.