Maharashtra Political Crisis : बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी रात्री कात्रज चौकात हल्ला झाला. मात्र, काल झालेला हल्ला खरोखरच पूर्वनियोजित होता का? हल्ला हा माझ्यावर करायचा होता की मुख्यमंत्र्यांवर करायचा होता?, असा सवाल सामंत यांनी उपस्थित केला आहे.

हायलाइट्स:
- काल झालेला हल्ला खरोखरच पूर्वनियोजित होता का?
- हल्ला हा माझ्यावर करायचा होता की मुख्यमंत्र्यांवर करायचा होता?
- माजी मंत्री उदय सामंत यांचा सवाल
कालचा झालेला हल्ला हा मुख्यमंत्र्यांवर करायचा होता का?
यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाल की, मला हीच शंका आहे की, त्या ताफ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत देखील होते म्हणजे कालचा झालेला हल्ला हा मुख्यमंत्र्यांवर करायचा होता का? लोकशाहीमध्ये कोणाचे एवढ धाडस कस काय वाढू शकत. ज्या मुख्यमंत्र्यानी शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री असा प्रवास केला आहे. ठीक आहे त्यांचे विचार पटत नसतील त्यांचे आणि अन्य लोकांचे विचार वेगळे असतील पण त्यामुळे कोणाला मारणे किंवा हल्ला करणे हे कुठपर्यंत योग्य आहे. ही लोकशाहीची थट्टा काही लोक करत आहे. याचा परिणाम पुढच्या निवडणुकीत काही लोकांना बघायला मिळेल, असा इशारा उदय सामंत यांनी यावेळी दिला आहे. अशा प्रकारे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, अशी विनंती देखील राजकीय नेत्यांना उदय सामंत यांनी यावेळी केली आहे. ही लोकशाही आहे आणि विचारांची लढाई ही विचारांनी लढली पाहिजे याला तोड, याला मारा, याला ठार मारा या गोष्टी होऊ शकत नाही, असंही सामंत म्हणाले.
“या हल्ल्यानंतर सुभाष देसाई यांनी प्रतिक्रिया दिली ती प्रतिक्रिया उत्फूर्त होती”
“या हल्ल्यानंतर सुभाष देसाई यांनी प्रतिक्रिया दिली ती प्रतिक्रिया उत्फूर्त होती. मात्र, हे चांगल झाल असं बोलणे खूप सोपं आहे. पण मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की, ज्या लोकांना अटक करण्यात आली किंवा अटक होणार आहे. त्यांना सोडवायला कोण जाणार आहे? ज्या लोकांना अटक झाली त्यांच्याबाबत आम्हाला सहानुभूती आहे. कारण कुठेतरी प्रक्षोभक भाषण ऐकून त्यांनी केलेला हा प्रकार असून हा झालेला हल्ला खरोखरच पूर्वनियोजित होता का? आणि तो मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावरचा होता की माझ्या ताफ्यावरचा होता याचा देखील तपास होणे गरजेचे असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं. याप्रकरणी पोलीस तपास सुरु असून पोलीस यंत्रणा चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. काल मुख्यमंत्री देखील पुण्याच्या दौऱ्यावर होते आणि त्यांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली आहे. कालचा जो हल्ला झाला तो निंदनीय आणि भ्याड होता माझ्यासोबत पोलीस होते म्हणून बचावलो पोलीस नसते तर मात्र फार मोठा प्रसंग घडू शकला असता, असं देखील उदय सामंत यांनी सांगितलं.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.