नवी दिल्ली: तुम्ही कधी नरकाचा दरवाजा पाहिला आहे का? सोशल मीडियावर एका महाकाय खड्ड्याचे फोटो व्हायरल होत आहेत. जे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. शनिवारी चिलीमध्ये (Chile) या महाकाय खड्ड्याच्या निर्मितीमुळे एकच खळबळ उडाली. एका टेनिस कोर्टपेक्षाही मोठा असलेला हा खड्डा ६५० फूट (२०० मीटर) खोल आणि ८२ फूट (२५ मीटर) रुंद आहे. याचा संबंध तांब्याच्या खाणीशी असल्याचं सांगितलं जात आहे. ज्या ठिकाणी हा खड्डा तयार झालाय ते ठिकाण चिलीची राजधानी सॅंटियागोपासून सुमारे ६५० किलोमीटर अंतरावर आहे. सोमवारी चिलीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली.

Mysterious 650 Feet Deep Giant Sinkhole

चिली देशात जमिनीत अनाचक रहस्यमयी खड्डा तयार

खड्ड्यामुळे कुठलीही जिवीतहानी नाही

‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, चिलीच्या उत्तरेकडील टिएरा अमरिला टाउनमध्ये अचानक हा भलामोठा खड्डा तयार झाला. हा खड्डा ज्या ठिकाणी बनला आहे ते ठिकाण ‘लंदिन मायनिंग’ (Lundin Mining) या कॅनडाच्या कंपनीच्या ताब्यात आहे. या खड्ड्याजवळ प्रचंड मोठी ‘अल्कापरोसा खाण’ (Alcaparrosa mine) आहे.

हेही वाचा –वाढदिवशीच बॉडीबिल्डरचा दुर्दैवी अंत; २३ इंचाचे बायसेप्स बनवण्याचा हट्ट जीवावर

‘लंदिन मायनिंग’ने सांगितले की, हा खड्डा तयार झाल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ‘लंदिन मायनिंग’ कडे ८०% जमिनीचे हक्क आहेत. तर उर्वरित जपानच्या सुमितोमो कॉर्पोरेशनकडे आहे. जिथे हा खड्डा तयार झाला त्याच्यापासून सर्वात जवळचं घरं हे अवघ्या ६०० मीटरच्या अंतरावर आहे.

Mysterious 650 Feet Deep Giant Sinkhole१

चिली देशात जमिनीत अनाचक रहस्यमयी खड्डा तयार

तळाशी मोठ्या प्रमाणात पाणी

नॅशनल सर्व्हिस ऑफ जिओलॉजी अँड मायनिंग (Sernageomin) चे संचालक डेव्हिड मॉन्टेनेग्रो यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी या भागात तज्ञ पाठवले आहेत. तळाशी कोणतेही मटेरिअल आढळले नाहीत. परंतु पाणी मोठ्या प्रमाणात आहे. हा खड्डा कसा निर्माण झाला याची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. पण, याला खाणीच्या कामाशी जोडलं जात आहे. हा खड्डा अजूनही वाढत असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा –वेडी नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये काय करतेय, डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा घसरली

“रस्ता नाही, माझ्या आईचं निधन झालं, मी पूल बांधला तो सुद्धा वाहून गेला”, कसाबखेडा गावाचा संपर्क तुटला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here