‘मासूम सवाल’ सिनेमाच्या पोस्टवरून वादंग, सॅनिटरी पॅडवर श्रीकृष्णाचं चित्र
कंगनानं तिच्या इन्स्टा स्टोरीवर #BoycottLaalSinghChaddha या वादाचा मास्टर माईंड खुद्द आमिर खान हाच असल्याचं सांगणारी एक पोस्ट शेअर केली आहे. कंगनाच्या मते आमिरनं त्याचा सिनेमा रिलीज होण्याआधी जाणीवपूर्वक हा वाद निर्माण करतो असं म्हटलं.
कंगनाच्या मते आमिरला त्याचा सिनेमा फ्लॉप होण्याची भिती आहे. त्यामुळेच त्यानं हा वाद निर्माण केला. बुधवारी कंगना रणौतनं (Kangana Ranaut) तिच्या इन्स्टा स्टोरीवर लिहिलं की, ‘मला असं वाटतं आहे की, आगामी लाल सिंह चड्ढा सिनेमासंदर्भात ज्या काही नकारात्मक गोष्टी पसरवल्या जात आहे त्याचा मास्टर माईंड खुद्द आमिर खान (Aamir Khan) हाच आहे.’ कंगनानं तिच्या पोस्टमध्ये ‘भूल भुलैया २’ असा उल्लेख करून लिहिलं की, यावर्षी एकाही कॉमेडी सिनेमाचा सीक्वेल यशस्वी ठरलेला नाही. भारतीय संस्कृतीशी संबंधित दाक्षिणात्य सिनेमे चांगली कामगिरी करत आहेत. लोकांशी नाळ जोडलेले सिनेमे यशस्वी ठरत आहेत.

आमिर खाननं हिंदूफोबिक सिनेमे करतो
कंगनानं तिच्या पोस्टमध्ये पुढं म्हटलं आहे की, ‘हॉलिवूडचा रिमेक असलेले सिनेमे पारसे चालत नाहीत. परंतु ते भरताला असहिष्अणू म्हणतात. हिंदी सिनेमा निर्मात्यांना प्रेक्षकांची आवड, त्यांची नाळ ओळखण्याची गरज आहे. हिंदू अथा मुसलमान होण्याचा मुद्दा इथं नाही. आमिरनं हिंदूफोबिक पीके तयार केला होता आणि भारताला असहिष्णू देश असं म्हटलं होतं. त्याचा हा सिनेमा खूपच लोकप्रिय ठरला होता. कृपा करून धर्म अथवा त्याच्याशी संबंधित विचारांना जोडणं बंद करा. ही गोष्ट त्यांचे वाईट सिनेमा अथवा त्यांचा वाईट अभिनय यापेक्षा वेगळी गोष्ट आहे.’
‘आमिर खानमुळेच माझ्या मुलीच्या हातून हिट सिनेमा निसटला’
सोशल मीडियावर आमिर खानचे जुने व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यातच आता कंगनानं अशा पद्धतीनं वक्तव्य केलं आहे. आमिरचे जे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत त्यामध्ये त्यानं देश असहिष्णू झाल्याचं म्हटल्याचा व्हिडिओ देखील आहे. असहिष्णू वातावरणामुळे बायकोला देशात राहणं सुरक्षित वाटतं नसल्याचं त्यानं या व्हिडिओत म्हटलं आहे.
आमिर खानचा २०१४ मध्ये पीके हा सिनेमा रिलीज झाला होता. त्यामध्ये शंकराची वेशभूषा केलेला कलाकार टॉयलेटमध्ये जाताना दाखवला होता. त्यावरून खूप वाद निर्माण झाला होता. काहींनी तर पीके हा हिंदू विरोधी असल्याचं म्हटलं होतं. कंगनानंदेखील तिच्या पोस्टमध्ये सोशल मीडियावर होणाऱ्या गोष्टींचा उल्लेख केला आहे.
दरम्यान, कंगनाच्या कामाबद्दल सांगायचे तर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला धाकड हा सिनेमा सपशेल अपयशी ठरला. तर लवकरच तिचा इमर्जन्सी हा सिनेमा येणार आहे.त्यामध्ये कंगनानं इंदिरा गांधी ही भूमिका साकारली आहे.तसंच सिनेमाचं दिग्दर्शनही तिनं केलं आहे.
‘संजय माझ्याकडे नटरंगसाठी आलेला पण…