मुंबई : तुमचा यावर विश्वास बसणं कठीण आहे. पण हे खरं आहे. किशन श्रीकांत तेव्हा होता फक्त ९ वर्षांचा. त्यावेळी त्यानं एका सिनेमाचं दिग्दर्शन केलं. सिनेमाचं नाव होतं C/o Footpath. हा सिनेमा एका वेळी ५ भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. सिनेमा थिएटरमध्ये १०० दिवस चालला. किशन श्रीकांतनं स्वत: लिहिलेल्या एका शाॅर्ट फिल्मवरून सिनेमा बनवला होता. या सिनेमानं सर्वोत्तम बाल चित्रपटाचा पुरस्कारही पटकावला होता.

कंगनाचा दावा- आमिरनेच सुरू केलं ‘लाल सिंह चड्ढा बॉयकॉट’चा वाद

जॅकी श्राॅफ आणि सौरभ शुक्ला यांनी केलेलं काम

Kishan Shrikant

ज्या वयात मुलं खेळतात, बागडतात त्या वयात किशननं पूर्ण सिनेमाचं दिग्दर्शित केला होता. किशननं स्वत:चं कॅमेरा हाताळला. कुठला शाॅट कधी घ्यायचा याचा निर्णयही त्याचाच होता. महत्त्वाचं म्हणजे ९ वर्षाच्या दिग्दर्शकाबरोबर काम करायला जॅकी आणि सौरभ तयारही झाले, ही मोठी गोष्ट.

जॅकीनं केलं होतं कौतुक

Kishan Shrikant

जॅकी श्राॅफनं त्याला जिनियस म्हटलं होतं. एका मुलाखतीत जॅकी म्हणाला होता, ‘किशन श्रीकांत एक जिनीयस आहे. त्याला शाॅट कसा घ्यायचा, हे बरोबर माहीत होतं. तो नेहमी काही वेगळं देत असे. कलाकाराकडून काय हवं, हे त्याला बरोबर माहीत होतं.’

२६ वर्षांचा आहे किशन श्रीकांत, फोर्ब्सनंही केला सन्मान

Kishan Shrikant

किशन श्रीकांत आता २६ वर्षांचा आहे. आतापर्यंत त्यानं २४ सिनेमे आणि अनेक टीव्ही शो दिग्दर्शित केले आहेत. तो ३ डी मेडिकल लर्निंग प्रोग्रामचा को-फाऊंडर आहे. सर्वात कमी वयाचा बिझनेसमन म्हणून फोर्ब्स मासिकात त्याचं नाव आलं.

राखी सावंतची नौटंकी! बाॅयफ्रेंडसमोर केला नागिन डान्स, Video झाला व्हायरल

कमी वयात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण
किशन श्रीकांतचा जन्म ६ जानेवारी १९९६ रोजी झाला. दहावीनंतर १६ व्या वर्षी त्यानं मास्टर्स डिगरी मिळवली. कर्नाटक सरकारनं स्पेशल परवानगी दिली होती.

बिपाशाला त्रास झाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here