राहुल गांधी यांना चित्रदुर्ग श्री मुरुघा मठाचे डॉ. श्री शिवमुर्ती मुरुघा शरणारु यांनी लिंग दीक्षा दिली. लिंगायत समाजातील व्यक्तींना लिंग दीक्षा दिली जाते आणि त्यांना इष्टलिंग परिधान करण्यास सांगितलं जातं. राहुल गांधी यांना मठातील हवेरी होसामट्टी स्वामी यांनी ते इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या प्रमाणं पंतप्रधान होतील, असा आशीर्वाद दिला. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी पंतप्रधान झाले होते. राहुल गांधी यांनी लिंगायत समुदायाची लिंग दीक्षा घेतली आहे ते पंतप्रधान होतील, असं ते म्हणाले. मात्र, यावेळी मठाचे अध्यक्ष श्री शिवमुर्ती मुरुघा शरणारु यांनी असं बोलू नका, ते बोलण्याचं हे ठिकाण नाही, त्याबाबत लोक ठरवतील, असं म्हणत हवेरी होसामट्टी स्वामींना शांत राहण्यास सांगितलं.
देशात या वर्षी फडकणार २० कोटी राष्ट्रध्वज; देशभरात असा तयार होतोय तिरंगा
इष्टलिंग नेमकं काय?
लिंगायत समाजातील व्यक्ती गळ्यात भगवान शकरांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी इष्टलिंग घालतात. लिंगायत धर्माचे अनुयायी हारासोबत इष्टलिंग परिधान करतात. इष्टलिंग परिधान करणारे व्यक्ती भगवान शंकराची प्रार्थना करतात. लिंगायत व्यक्तीला ज्यावेळी प्रार्थना करायची असते त्यावेळी ते गळ्यातील शिवलिंग हातावर ठेऊन पार्थना करतात.
राहुल गांधी कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धारामय्या यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी राहूल गांधी कर्नाटकमध्ये पोहोचले आहेत. राहुल गांधी यांनी यावेळी लिंगायत समुदायामध्ये महत्त्व असलेल्या चित्रदूर्गमधील मठाला भेट दिली. कर्नाटकमध्ये १७ टक्के लोकसंख्या लिंगायत समुदायाची आहे. मात्र, लिंगायत समुदाय भाजपला मतदान करत आलेला आहे. राहुल गांधी यांच्या दौऱ्यानं किती परिणाम होणार हे येणाऱ्या काळात दिसून येईल. कर्नाटकमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणूक होणार आहे.