Authored by prasad lad | Maharashtra Times | Updated: Aug 3, 2022, 8:58 PM

T 20 WORLD CUP : ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकण्यासाठी भारताने आता एक मोठे पाऊल उचलले आहे. विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला चांगला सराव मिळावा म्हणून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या दिग्गज संघांबरोबर ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्याचे भारताने ठरवले आहे. या दोन्ही देशांबरोबरच्या मालिकांचे वेळापत्रक आता जाहीर करण्यात आले आहे. या मालिकेतील सामने कधी होतील, जाणून घ्या…

 

team india
नवी दिल्ली : भारताने आता ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे मिशन हाती घेतले आहे. त्यामुळे या विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला चांगला सराव मिळावा म्हणून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या दिग्गज संघांबरोबर ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्याचे भारताने ठरवले आहे. या दोन्ही देशांबरोबरच्या मालिकांचे वेळापत्रक आता जाहीर करण्यात आले आहे. वाचा-

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन ट्वेन्टी-२० आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. पहिल्यांदा ट्वेन्टी-२० मालिका होईल आणि त्यानंतर वनडे मालिका खेळवण्यात येईल. भारत आमि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिका ही २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हा २८ सप्टेंबरला थिरुवनंतपुरम येथे होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना हा २ऑक्टोबरला गुवाहाटी येथे होणार आहे. त्यानंतर या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना इंदूर येथे ४ ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिका ही ६ ते ११ ऑक्टोबर या कालावधीमध्ये खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हा ६ ऑक्टोबरला लखनौ येथे खेळवण्यता येणार आहे. त्यानंतर दुसरा सामना हा ९ ऑक्टोबरला रांची येथे खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना हा ११ ऑक्टोबरला दिल्ली येथे खेळवण्यात येणार आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ थोडा काळा विश्रांती करेल आणि त्यानंतर विश्वचषकासाठी सज्ज होईल.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here