नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत त्यांच्या खात्यासंदर्भातील प्रश्नांना उत्तरं दिली. राज्यसभेच्या खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना देशातील टोलनाक्यांचा जनक मीच असल्याचं ते म्हणाले. आम्ही १९९० च्या दशकात महाराष्ट्रात पहिल्यांदा मंत्री असताना त्या तत्त्वावर महामार्ग बांधल्याचं त्यांनी सांगितलं.

राज्यसभेत नितीन गडकरींना थंबीदुराई यांनी प्रश्नोत्तराच्या तासावेळी शहराजवळ एक्स्प्रेस वेवर टोलनाके उभे केल्यानं संबंधित शहरातील नागरिकांना आर्थिक फटका बसत असल्याचं सांगितल. स्थानिक नागरिकांना एक्स्प्रेस वेच्या कमी वापरासाठी देखील टोल भरावा लागत असल्याचं नितीन गडकरींच्या निदर्शनास आणून दिलं. नितीन गडकरींनी यासंदर्भात बोलताना यूपीएचं सरकार असताना हा प्रश्न निर्माण झाल्याचं सांगितलं. २०१४ पूर्वी यूपीएचं सरकार असताना शहरांजवळ टोलनाके उभारण्यात आले आणि नागरिकांना टोल भरावे लागले. नागरिक एक्स्प्रेस वेचा १० किलोमीटरचा प्रवास करतात आणि त्यांना ७५ किलोमीटरचा टोल भरावा लागतो हे दुर्दैवी आणि बेकायदेशीर आहे, आम्ही यामध्ये सुधारणा करु असं नितीन गडकरी म्हणाले.

खूब लड़ी मर्दानी… दुखापतीनंतरही मैदानात उतरली, पदक नाही पण भारताचे नाव पूर्णिमाने राखले

टोलनाका पद्धतीचा मीच जनक

सुदैवानं आणि दुर्दैवानं टोलनाका पद्धतीचा जनक मीच आहे. देशात पहिल्यांदा टोल पद्धत मीच सुरु केली आहे. बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावंर आम्ही ठाण्यात याची सुरुवात केल्याचं नितीन गडकरी म्हणाले. नितीन गडकरी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना १९९५ ते १९९९ दरम्यान मुंबई पुणे एक्स्प्रेस वेचं काम बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वानुसार करण्यात आलं होतं.

मुख्यमंत्री शिंदेंनी थेट शिवसेनेच्या जबड्यातच हात घातला!, मुंबई महापालिकेबाबतचा ठाकरेंचा निर्णय बदलला

आता आपण नवी पद्धत आणत आहोत. त्यामुळं शहरी भागातील लोकांना टोल भरण्यातून वगळलं जाईल, असं नितीन गडकरी म्हणाले. शहरातील लोक १० किलोमीटरचा रस्ता वापरतात आणि ७५ किमीच्या वापराचा टोल भरतात. हे चुकीचं आहे. मात्र, हा माझ्या काळातील प्रश्न नाही, मागील सरकारच्या काळातील हा प्रश्न आहे. आम्ही त्यात दुरुस्ती करु, असंही नितीन गडकरी म्हणाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचं देखील गडकरींनी सांगितलं.

TET गैरव्यवहार प्रकरणी ७ हजार ८८० जणांना दणका; सेवेत असलेल्यांवर देखील कारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here