Commonwealth Games 2022 : राष्ट्रकुल स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारताच्या लवप्रीत सिंहने वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदकाची कमाी केली होती. हे एकच पदक भारताला आज दुपारपर्यंत पटकावता आले होते. पण भारताने हॉकी आणि बॉक्सिंगमध्ये भारताने विजय मिळवले. त्यामुळे या खेळांमध्ये भारताला पदक मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता भारताला अजून कोणत्या खेळांमध्ये पदक मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

यापूर्वी भारताचा स्क्वॉशपटू सौरव घोषालने धडाकेबाज कामगिरी करत भारताला अजून एक पदक जिंकवून दिले. पुरुषांच्या सामन्यात सौरवने इंग्लंडच्या जेम्स विल्स्ट्रॉपवर दणदणीत विजय साकारला आणि भारताला कांस्यपदक पटकावून दिले होते. भारताच्या पूर्णिमा पांडेने हार मानली नाही. पूर्णिमाने वेटलिफ्टिंगच्या ८७ किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये उतरून सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. पूर्णिमाला पदक मिळवता आले नाही, पण तिने भारताचे नाव मात्र राखले होते.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.