मुंबई : सध्या रंगभूमीवर अलबत्या गलबत्या या रत्नाकर मतकरींच्या नाटकात अभिनेता वैभव मांगले काम करत आहे. पण हे नाटक जेव्हा पहिल्यांदा आलं, तेव्हा त्यात दिलीप प्रभावळकर चेटकिणीची भूमिका साकारत होते. नाटक संपलं की आलेले प्रेक्षक, विशेष करून बच्चे कंपनी चेटकिणीचं नाक कसं आहे, केस कसे आहेत, हे पाहायला जात असत. मग प्रभावळकरही त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारत असत.

नवव्या वर्षी केलं होतं सिनेमाचं दिग्दर्शन, जॅकी श्राॅफकडून करून घेतलं होतं काम, गिनीज बुकात नाव

असाच एकदा दिलीप प्रभावळकर यांनी किस्सा सांगितला. अलबत्या गलबत्या हे त्यांचं पहिलं व्यावसायिक नाटक. ते लहान मुलांमध्ये खूप लाडकं नाटक होतं. त्याचे प्रयोगही खूप व्हायचे. असेच २-३ प्रयोग होते पुण्याला. या नाटकातली चेटकीणच आकर्षणाचा भाग होती. मुलं घाबरायचीही आणि त्यांना ती आवडायचीही. तिचं मोठालं नाक, मोकळे सोडलेले लांब केस, डोळ्याभोवतीची काळी वर्तुळं, तिचा ढगळा पोशाख हे सर्व पाहायला मुलं नाटक संपलं की बॅकस्टेजला यायची.

अलबत्या गलबत्यामध्ये आता वैभव मांगले

असाच एकदा पुण्यातला प्रयोग रंगला होता. प्रयोग शाळेत होता. तो संपल्यानंतर बच्चे कंपनी आपल्या आईबाबांबरोबर प्रभावळकरांना भेटायला गेले. तेही मुलांशी बोलताना बाकी सगळं विसरून गेले. तिथून दुसऱ्या प्रयोगासाठी निघायचं होतं. त्यासाठी दोन गाड्या होत्या. काही वेळानं गाड्या सुटल्या. प्रत्येकाला वाटलं प्रभावळकर दुसऱ्या गाडीत असतील. त्यांना हे लक्षात येईपर्यंत उशीर झाला होता.

प्रभावळकरांकडे वेळ कमी होता. लगेच पुढचा प्रयोग होता. त्यामुळे वेशभूषा काढता येणार नव्हती. गाड्या निघून गेल्या असं कळल्यावर आली मोठी पंचाईत. त्यावेळी मोबाइल फोनही नव्हते. मग काय, ज्येष्ठ अभिनेते रस्त्यावर चेटकिणीच्या वेषात रिक्षाला हात करत राहिले. पण एकही थांबायला तयार नाही. मग कसाबसा एक स्कुटरवाला थांबला. त्याला खरं काय ते कळल्यावर त्यानं प्रभावळकरांना मागे बसवलं.

आपल्या सगळ्यात मोठ्या गुरूंबद्दल काय म्हणाली सई ताम्हणकर? अभिनेत्री हाॅट सीटवर

अभिनेते पुढच्या प्रयोगाला वेळेत पोहोचले खरे, पण हा अख्खा प्रवास गर्दीच्या रस्त्यावर वेगळाच ठरला. कारण लोक दचकून, घाबरून त्यांच्याकडे बघत होते. जणू खरी चेटकीण आलीय, असंच सगळ्यांना वाटत होतं.

दिलीप प्रभावळकरांच्या सर्वच भूमिका अजरामर ठरल्या. मग चिमणराव असेल नाही तर गांधीजी. अलिकडेच त्यांनी दिठी सिनेमातही भूमिका साकारली.

रणबीर काम करताना पूर्ण झोकून देतो, सांगतेय ‘शमशेरा’ची आई आणि पत्नी!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here