Amruta Fadnavis Hand Mangalsutra | अमृता फडणवीस यांनी मी लग्नापूर्वी एकदाही ब्युटी पार्लरमध्ये गेली नव्हते, असेही सांगितले. फक्त लग्नाच्यावेळी जो मेकअप करतात, तेवढाच मी केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी माझा चेहरा महत्त्वाचा नाही. ते स्त्रीचा चेहरा किंवा बाकी काही पाहत नाहीत, तर तिचं मन पाहतात, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.

 

Amruta Fadnavis Mangalsutra
अमृता फडणवीस

हायलाइट्स:

  • अमृता फडणवीसांनी चेहऱ्याची प्लॅस्टिक सर्जरी केल्याची चर्चा असते
  • अमृता फडणवीसांनी स्वत:च स्पष्ट सांगितलं
  • प्लॅस्टिक सर्जरी महागडा प्रकार
मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कायमच त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. राजकारण, गायन आणि सामाजिक विषय अशा सर्वच विषयांमध्ये अमृता फडणवीस यांनी केलेली वक्तव्यं ही चर्चेचा विषय ठरतात. अमृता यांनी नुकतीच ‘झी मराठी वाहिनी’वरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना अनेक मजेशीर प्रश्न विचारण्यात आले. त्यावर अमृता फडणवीस यांनीही आपल्या नेहमीच्या बिनधास्त शैलीत उत्तरे देत जोरदार बॅटिंग केली. यावेळी अमृता फडणवीस यांना मंगळसूत्राविषयी (Mangalsutra) प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अमृता यांनी दिलेले उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. (Amruta Fadnavis statement about Mangalsutra)
देवेंद्र रात्री वेश बदलून एकनाथ शिंदे यांना भेटायला जायचे, अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
या कार्यक्रमात एका बाईने अमृता फडणवीस यांना विचारले की, ‘ तुम्ही गळ्यात मंगळसूत्र घातलं नाही तर सासूबाई ओरडत नाहीत का?’ त्यावर अमृता फडणवीस यांनी आपली भूमिका मांडताना म्हटले की, मंगळसूत्र हे सौभाग्याचं प्रतिक आहे. ते गळ्यात घातलं तर पतीने तुमचा गळा पकडला असतं वाटतं, त्यामुळे मी मंगळसूत्र हातात घालते. त्यामुळे देवेंद्रजींनी (Devendra Fadnavis) सतत माझा हात धरला आहे, असे मला वाटते. तुम्ही मंगळसूत्र गळ्यात घातलंय म्हणून नवऱ्याने तुमचा गळा पकडलाय, असं तुम्हाला वाटत असेल, अशी मिश्कील टिप्पणी अमृता फडणवीस यांनी केली.
उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींच्या वजनाची उडवली खिल्ली, अमृता फडणवीस म्हणाल्या…
अमृता फडणवीस चेहऱ्याच्या प्लॅस्टिक सर्जरीविषयी काय बोलल्या?

या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांना ‘तुम्ही चेहऱ्याची प्लॅस्टिक सर्जरी केलेय का?’, असा प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी म्हटले की, चांगलं झालं तुम्ही मला हा प्रश्न विचारलात. मला यावरुन अनेक लोक सोशल मीडियावर ट्रोल करतात. प्लॅस्टिक सर्जरी ही खूप महागडी गोष्ट आहे. त्यामध्ये मोठा धोका असतो. काही बिघडलं तर तुमच्या चेहऱ्याची सगळी फिचर्स बिघडू शकतात, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here