कल्याण :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे डोंबिवली मध्यवर्ती शाखेतील खासदार कार्यालयातून हटवलेले फोटो पुन्हा लावण्यासाठी शिंदे समर्थकांनी धडक देत धक्काबुक्की आणि मारहाण करत गोंधळ घातला होता. यावेळी शाखेत शिंदे समर्थकांना विरोध करणाऱ्या महिला विधानसभा संघटक कविता गावंड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अपशब्दाचा वापर करत त्यांना उद्देशून शिवीगाळ केली होती. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी गावंड यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

डोंबिवली मध्यवर्ती शाखेतच खासदार डॉ शिंदे यांचेदेखील कार्यालय आहे. मात्र शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी खासदार कार्यालयातील शिंदे पिता-पुत्राचे फोटो हटवून शिंदे समर्थकांना शाखेत येण्यास प्रतिबंध केला होता. मात्र मंगळवारी शिंदे समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने शाखेत शिरले, त्यांनी शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत शिंदे यांचे हटवलेले फोटो पुन्हा भिंतीवर लावले. यावेळी शाखेत उपस्थित असलेल्या ठाकरे समर्थक आणि शिंदे समर्थकामध्ये धक्काबुक्की आणि हाणामारी झाली होती. मात्र पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती.

आदित्य ठाकरेंच्या सभांना गर्दी का? भाजप खासदार सुजय विखेंनी सांगितलं गणित

पुरुष कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याची तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलेल्या ठाकरे समर्थक महिला कार्यकर्त्यांची पोलिसांनी दखल घेतली नव्हती. यानंतर काही वेळातच पोलिसांनी गावंड यांच्यावर मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here