मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यातील भिंतींवर काही अपशब्द लिहिल्यानं पुन्हा एकदा राजकारण तापू लागलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या सुरूवातीच्या काही अक्षरांचा उल्लेख करत बंगल्याच्या भिंतीवर काही अपशब्द लिहिण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त ‘भाजपा रॉक्स, देवेंद्र फडणवीस रॉक्स’ अशीही वाक्य भितींवर लिहिण्यात आली आहेत. यासंदर्भात एक व्हिडीओ समोर आला आहे. परंतु या हे कोणी लिहिलं याबाबत मात्र कोणतीही माहिती समोर आली नाही.