परभणी: माझ्या मित्राचे वडील पुजारी आहेत. त्यांना सव्वा तीन किलो सोने सापडले आहे.त्याची किंमत ४५ लाख रुपये इतकी आहे. असे सांगून एका ट्रान्सपोर्ट व्यवसायिकाला भामट्यांनी ४ लाख ९३ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी एकूण सात जणांवर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पांडूरंग बाबा गावडे रा. पुणे आसे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. २५ जुलै रोजी पांडूरंग गावडे हे घरी असताना त्यांना त्यांच्या मोबाईलवर फोन आला. संबंधिताने जुनी ओळख सांगितली. त्यानंतर त्याने मित्राचे वडील पुजारी असून त्यांना सव्वा तीन किलो सोने सापडले आहे, असे सांगितले. हे सोने घ्यायचे असेल तर याची किंमत ४५ लाख रुपये एवढी सांगितली. त्यानंतर ४० लाख रुपयात व्यवहार ठरला. त्यानुसार पांडूरंग गावडे हे उर्वरित रक्कम घेऊन सोने घेण्यासाठी आले. ३० जुलै रोजी पांडूरंग गावडे सेलू येथे पोहोचले. त्यांनी त्यांच्या मित्राला गाडी घेऊन येण्यास सांगितले. आरोपी बाळू याने गावडे यांना मंठा येथे येण्यास सांगितले. मंठा व वाटुर फाटा दरम्यान त्यांची भेट झाली. या ठिकाणी आरोपींनी सोने दाखवून सदर सोने दिड किलो असल्याचे सांगितले. त्या बदल्यात सहा लाख रुपये रोख व उरलेली रक्कम पुणे येथे देण्याचे ठरले.
तीन वर्षांपासून १६ वर्षांच्या मुलासोबत घडत होता किळसवाणा प्रकार; पालकांना समजताच बसला धक्का
गावडे यांनी काही रक्कम काढली. ५ लाख ८५ हजार रुपये घेऊन फिर्यादी हे जिंतूरकडे आले. या ठिकाणी आरोपी बाळू व त्याच्या सोबत असलेल्या काहींनी गावडे यांचे वाहन थांबविले. गावडे यांनी त्यांना पैसे दिले. पैसे मोजून झाल्यानंतर आरोपींनी गावडे यांना तुम्ही गाडीमध्ये चला, तिकडे सोने देतो, असे सांगितले. या दरम्यान जिंतूरकडून एक चार चाकी वाहन आले. या वाहनातून चार ते पाच जण उतरले. त्यांनी आम्ही पोलीस आहोत, आमची तुमच्यावर नजर होती. तुम्हाल तुरुंगात टाकतो, असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. संबंधितांनी पांडूरंग गावडे यांना तुम्ही यांच्या सोबत आहेत का असे विचारले असता भिती वाटल्याने गावडे यांनी मी त्यांच्या सोबत नाही, असे सांगुन गाडी घेऊन जालनाकडे निघाले.

घडला प्रकार त्यांनी मित्रास सांगितला. त्यानंतर पांडूरंग गावडे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. बाळू व त्याच्या सोबतचे दोघेजण यांनी फिर्यादीस कमी भावात सोने देण्याचे अमिष दाखवून २ खरे सोन्याचे शिक्के देवून बाकी सोन्याचे शिक्के देण्याचे अमिष दाखवून जिंतूर जवळ बोलावून घेतले. या ठिकाणी सोने देत असताना चार ते पाच लोकांनी पोलीस असल्याचे सांगुन त्यांना पकडल्यासारखे भासवून ४ लाख ९३ हजार रुपये घेत फसवणूक केली. या प्रकरणी पांडूरंग गावडे यांच्या फिर्यादीवरुन बाळू व त्याच्या सोबतचे दोघेजण आणि इतर अनोळखी चार यांच्यावर जिंतूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई;शहराचे विद्रुपीकरण रोखण्याते प्रयत्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here