मुंबई: आपल्या सुमधूर आवाजाची देणगी देऊन काळाच्या पडद्याआड गेलेल्या किशोर कुमारांचा (Kishor Kumar Birth Anniversary) आवाज आजही त्यांच्या चाहत्यांच्या मनात रूंजी घालत आहे. आभासकुमार गांगुली ते किशोर कुमार हा त्यांचा प्रवास खूपच कष्टाचा आणि संघर्षाचा आहे. पण त्याहीपलीकडे किशोर कुमार यांच्या खाजगी वैवाहिक आयुष्याचा पट खूप चढउतारांचा आहे. किशोर कुमार यांना अभिनयाचा आणि गाण्याचा सूर सापडला पण चार लग्नं होऊनही त्यांना वैवाहिक जीवनाचा सूर सापडला नाही. रूमा गुहा, मधुबाला, योगिता बाली आणि लीना चंदावरकर या चौघींशी लग्नं करूनही वैवाहिक आयुष्याची गाडी काही समाधानाच्या स्टेशनवर पोहोचली नाही.

हे वाचा-सिनेसृष्टीत ठेवायचं नव्हतं पाऊल, एका अपघातामुळे बदललं पूर्ण आयुष्य

किशोर कुमार यांचा जन्म मध्यप्रदेशमधील खंडवा येथे ४ ऑगस्ट १९२९ साली झाला. आज ते असते तर ९३ वर्षांचे असते. आभासकुमार गांगुली हे त्याचं खरं नाव. मोठे भाऊ अशोक कुमार यांनीच त्यांना अभिनय क्षेत्रात आणलं. सिनेमासाठी त्यांनी किशोर कुमार हे नाव स्विकारलं. त्यांचे वडील कुंजीलाल हे वकील होते तर चार भावंडांमध्ये किशोर हे शेंडेफळ होतं. अभिनयासोबत पडदयावर किशोर यांचा पार्श्वगायक म्हणून्ही प्रवास सुरू झाला. त्यांनी आजवर हिंदी भाषेसह मराठी, मल्याळम, गुजराती, भोजपुरी, आसामी, कन्नड या भाषेतूनही गाणी गायली.

जितकी किशोर कुमार यांची अभिनय आणि गीतगायनाची कारकीर्द गाजली तितकीच त्यांनी केलेली चार लग्नंही गाजली. कुशोर कुमार यांचं पहिलं लग्नं झालं ते दिग्दर्शक सत्यजित रे यांची भाची रूमा घोष यांच्याशी. त्याही गायिका होत्या शिवाय काही सिनेमात अभिनयही केला होता. आठ वर्षांचा संसार मोडून किशोर कुमार यांनी रूमा यांच्यापासून घटस्फोट घेतला. आजचा आघाडीचा गायक अमित कुमार हा किशोरदा आणि रूमा यांचाच मुलगा आहे. रूमा यांच्याशी घटस्फोट झाला त्या दिवशी किशोरकुमार यांनी त्यांची आलिशान गाडी जाळली होती जी त्यांनी रूमा यांच्यासोबत खरेदी केली होती.

किशोर कुमार

हे वाचा-एकेकाळी घरकाम करून केली कमाई; अशी मिळाली लोकप्रिय अभिनेत्रीची ओळख

रूमा यांच्यापासून वेगळं होण्याची प्रक्रिया सुरू असतानाच किशोर कुमार हे अभिनेत्री मधुबालाच्या प्रेमात पडले. पडद्यावर तर किशोरदा आणि मधुबाला यांची जोडी जमली होतीच, वास्तवातही १९६१ मध्ये ते नवराबायको झाले. दरम्यान त्याआधी मधुबाला आणि दिलीपकुमार यांचा ब्रेकअप झाला होता. मधुबाला मुस्लिम होत्या. त्यांच्याशी लग्न करण्यासाठी किशोरकुमार यांनी धर्मही बदलला आणि करीम अब्दुल असे नाव केले. पण मधुबाला यांच्यासोबत किशोर यांचं लग्न केवळ ९ वर्षच टिकलं. मधुबालाचं निधन झाल्यानं या नात्याचाही अंत झाला.

किशोर कुमार यांच्या आयुष्यात मधुबालाच्या निधनानंतर सात वर्षांनी आल्या त्या योगिता बाली. मधुबालाच्या विरहामुळे किशोर यांच्या जीवनात एकाकीपणा आला होता. योगिताची भेट झाल्यानंतर त्यांच्यात जवळीक वाढली. योगिताशी लग्नगाठ बांधली ते साल होतं १९७६. पण दोन वर्षातच योगिता आणि किशोर दा वेगळे झाले. असं म्हणतात की योगिता यांनी ते नातं गांभीर्याने घेतलच नाही.

किशोर कुमार

हे वाचा-चेटकिणीला पाहून सर्वांची झाली पळता भुई थोडी… दिलीप प्रभावळकरांनी सांगितला किस्सा

पहिल्या लग्नानंतरच्या २६ वर्षात किशोर कुमार यांनी तीन लग्नं केली मात्र त्यातील एकही दहा वर्षसुध्दा टिकलं नाही. मधुबालासोबत त्यांची केमिस्ट्री छान जुळायची पण मधुबाला दुर्धर आजाराने गाठल्याने सगळच विस्कटलं. १९८० नंतर हिंदी सिनेमा अमूलाग्र बदलला. गाण्याचा नवा बाज आला. अभिनय मागे टाकून किशोरदा गाण्यातच रमले. त्याच वेळी अभिनेत्री लिना चंदावरकर त्यांच्या आयुष्यात आली. किशोर दा यांच्यापेक्षा २० वर्षांनी लहान असलेल्या लीना आणि किशोर कुमार यांच्यात प्रेम जुळलं आणि त्यांनी लग्नंही केलं.

किशोर कुमार

१९५० साली रूमाशी लग्नं ते ८० च्या दशकात तरूण लीनाशी लग्नगाठ हे सगळच अनेक चर्चांना उधाण देणारं होतं. किशोरदांचा मोठा मुलगा अमित कुमार यांच्यापेक्षा लीना या फक्त दोन वर्षांनी मोठ्या होत्या. योगिता आणि मधुबाला यांना किशोर कुमार यांच्यासह मुल झाले नाही, पण रूमापासून अमित तर लीनापासून सुमित ही दोन मुलं त्यांना झाली. चार लग्नांपैकी रूमा आणि योगितापासून त्यांनी घटस्फोट घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here