इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये गेल्या २४ तासांत दोन हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. मंगळवारी भंवरकुआन पोलीस स्टेशन हद्दीतील नवलखा परिसरात ६ मुली आणि ३ तरुणांसह ९ जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणात मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी ही कारवाई करत एका हॉटेलमधून ६ मुली आणि ६ तरुणांना अटक केली.

या हॉटेलमध्ये अनेक दिवसांपासून सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यादरम्यान काही लोक नशाही करतात. छाप्यादरम्यान पोलिसांनी ईशान्य, बिहार आणि इंदूरमधील मुलींना अटक केली. यासोबतच हॉटेल मालक आणि व्यवस्थापकावरही कारवाई करण्यात आली आहे.
Aurangabad: लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनच पत्नीसोबत खेळला भयंकर डाव, तीन मुलांनंतर DNA तपासताच पोलीस चक्रावले
अतिरिक्त डीसीपी प्रशांत चौबे यांनी सांगितले की, पोलिसांना भंवरकुआन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेलमध्ये अवैध धंदे सुरू असल्याची माहिती मिळाली होती. स्थानिक पोलिसांनी तेथे छापा टाकून हॉटेल मालक, व्यवस्थापक, ६ मुली आणि इतरांना अटक केली. या आरोपींची पोलीस चौकशी करत असून इतर तथ्ये गोळा केली जात आहेत.

पुनीत गौर याने हॉटेल भाड्याने घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गेल्या एक वर्षापासून तो हॉटेल चालवत असल्याचे त्याने चौकशीत सांगितले. हॉटेलमधील अवैध कामांबाबत व्यवस्थापक म्हणाले की, गेल्या पाच महिन्यांपासून हा सर्व प्रकार सुरू आहे. पोलीस निवेदनाची सत्यता पडताळून पाहण्यात व्यस्त आहेत. अटक करण्यात आलेल्या काही मुली बिहार आणि ईशान्येतील आहेत.
Beed: शिक्षक पतीला सहकारी शिक्षिकेसोबत सेक्स करताना पकडलं, बीडमध्ये पुढे काय झालं पाहाच…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here