Sanjay Raut conflict with ED officer | संजय राऊत आणि ईडीच्या अधिकाऱ्यात थोडाफार वाद झाला. त्यानंतर संजय राऊत गाडीच्या दिशेने गेले, मात्र गाडीत बसण्यापूर्वी संजय राऊत यांनी फुटबोर्डवर उभे राहत हात उंचावून शिवसैनिकांना अभिवादन केले. त्यानंतर ईडीचे अधिकारी संजय राऊत यांना घेऊन कोर्टाच्या दिशेने रवाना झाले. ईडीने संजय राऊत यांची कालच वैद्यकीय तपासणी करवून घेतली होती. त्यामध्ये संजय राऊत यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे दिसून आले होते.

हायलाइट्स:
- संजय राऊत ईडीच्या (ED) कार्यालयाबाहेर निघून गाडीत बसत होते
- बंधू सुनील राऊत, जावई मल्हार नार्वेकर आणि शिवसेनेचे काही कार्यकर्ते आले होते
- संजय राऊत या सगळ्यांशी बोलत उभे राहिले होते
त्यामुळे संजय राऊत आणि ईडीच्या अधिकाऱ्यात थोडाफार वाद झाला. त्यानंतर संजय राऊत गाडीच्या दिशेने गेले, मात्र गाडीत बसण्यापूर्वी संजय राऊत यांनी फुटबोर्डवर उभे राहत हात उंचावून शिवसैनिकांना अभिवादन केले. त्यानंतर ईडीचे अधिकारी संजय राऊत यांना घेऊन कोर्टाच्या दिशेने रवाना झाले. ईडीने संजय राऊत यांची कालच वैद्यकीय तपासणी करवून घेतली होती. त्यामध्ये संजय राऊत यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे दिसून आले होते.
पत्राचाळ पुनर्विकास व एफएसआयमधील कथित घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर कोर्टाने चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती. ही कोठडी आज संपत असल्याने आज राऊत यांना पुन्हा ईडी अधिकाऱ्यांकडून कोर्टात नेण्यात आले. यावेळी संजय राऊत यांच्या वकिलांनी त्यांना ईडीच्या कोठडीत त्रास होत असल्याचे सांगितले. संजय राऊत यांना हदयाची व्याधी आहे. ईडीने त्यांना ज्या खोलीत ठेवले आहे, तिथे हवा खेळती नाही. त्यामुळे संजय राऊत यांना श्वास घेण्यास त्रास होतो, असे संजय राऊत यांच्या वकिलांनी पीएमएलए कोर्टात सांगितले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network