Maharashtra Parbhani Latest Accident News : परभणीतील सेलू तालुक्यातील डिग्रस जहाँगीर शिवारामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आठ दिवसापासून झोप येत नसल्यामुळे आजारपणाला वैतागून एका ७० वर्षीय व्यक्तीने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

हायलाइट्स:
- झोप येत नसल्यामुळे वैतागून आत्महत्या
- रेल्वेखाली उडी घेऊन केली आत्महत्या
- परभणीतील सेलू तालुक्यातील घटना
मोतीराम कटारे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. सेलू तालुक्यातील धनेगाव येथील मोतीराम कटारे यांना आठ दिवसापासून झोप येत नव्हती. त्यामुळे ते झोपेच्या आजाराला चांगलेच वैतागले होते. अखेर त्यांनी डिग्रस जहागीर शिवारात रेल्वे रुळावर ३ ऑगस्ट रोजी रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. याप्रकरणी मोतीराम दौलतराव कटारे यांच्या तक्रारीवरून सेलू पोलीस ठाणे मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत मोतीराम कटारे यांचे सेलू उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे धनेगाव येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network