ED Summons Varsha Raut: संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यातून काही व्यक्तींना मोठी रक्कम पाठवली गेली आहे. त्यांच्या खात्यातून मोठ्याप्रमाणावर आर्थिक व्यवहार झाले आहेत. पत्राचाळ प्रकरणात प्रवीण राऊत यांना HDIL ग्रुपकडून ११२ कोटी रुपये पाठवण्यात आले. त्यातील १ कोटी ६ लाख ४४ हजार रुपये वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले, अशी माहिती ईडीच्या वकिलांनी न्यायालयात दिली होती. त्यामुळे आता वर्षा राऊत मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

हायलाइट्स:
- संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स
- वर्षा राऊतांच्या खात्यातून काहींना मोठी रक्कम पाठवली
- पत्राचाळ प्रकरणात ईडीकडून वर्षा राऊतांना समन्स
ईडीच्या वकिलांनी गुरुवारी न्यायालयात वर्षा राऊत यांचा आर्थिक गैरव्यवहारात सहभाग असल्यासंदर्भात भाष्य केले होते. संजय राऊत हे यापूर्वी झालेल्या चौकशीवेळी सर्व माहिती देण्यास टाळाटाळ करत होते. मात्र, ईडीने त्यांच्या घरावर धाड टाकली तेव्हा काही कागदपत्रे सापडली होती. त्यावरून असे दिसते की, संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यातून काही व्यक्तींना मोठी रक्कम पाठवली गेली आहे. त्यांच्या खात्यातून मोठ्याप्रमाणावर आर्थिक व्यवहार झाले आहेत.
पत्राचाळ प्रकरणात प्रवीण राऊत यांना HDIL ग्रुपकडून ११२ कोटी रुपये पाठवण्यात आले. त्यातील १ कोटी ६ लाख ४४ हजार रुपये वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले, अशी माहिती ईडीच्या वकिलांनी न्यायालयात दिली होती. त्यामुळे आता वर्षा राऊत मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network