बर्मिंगहम : दिल्लीमधील महिला पोलिस उपनिरीक्षकाची मुलगी म्हणजेच ज्युडो खेळाडू तूलिका मान हिने बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये ज्युडो ७८ किलो वजनी गटात देशासाठी रौप्य पदक जिंकले आहे. २३ वर्षाच्या तूलिकाने ज्युडोमध्ये आंतरराष्ट्रीय पदक देखील जिंकले आहे. तूलिकाची आई अमृता सिंह या दिल्ली पोलिस खात्यात उपनिरीक्षक आहेत. तूलिका ज्यावेळेस २ वर्षांची होती तेव्हा तिच्या वडिलांची हत्या करण्यात आली. व्यावसायिक वैमनस्यातून तूलिकाचे वडील सतबीर मान यांची हत्या केली गेली. तूलिका हिला दोन बहिणी असून तिच्या भावंडांमध्ये ती मोठी आहे. तूलिकाच्या आईने नेहमीच तूलिकाला मार्गदर्शन केले.

तूलिकाने उपांत्य फेरीत न्यूझीलंडच्या सिडनी एण्ड्रयुज हिला पराभूत करत अंतिम फेरीत आपली जागा निश्चित केली होती. अंतिम फेरीत तिच्या प्रतिस्पर्ध्याने त्याच पद्धतीने तिच्यावर बाजी मारली आणि १ गुणाने पुढे गेल्यानंतर ही तिला हार मानत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पण तूलिकाची ही कामगिरी देखील विशेष आहे. अंतिम फेरीमध्ये तूलिकाला स्कॉटलंडच्या सारा एडलिंगटनने पराभूत केले. पण तूलिकाने देखील या सामन्यात आपला जबरदस्त खेळ दाखवला. परंतु बॉडीच्या स्लो मुव्हमेंटमुळे ती सुवर्ण पदकाला मुकली. त्या अंतिम सामन्यामध्ये सारा अधिक आक्रमक असल्याचं तिने संगितले.

मुंबईत १४०० कोटींचे ड्रग्स जप्त, तब्बल ७०० किलो मेफेड्रॉनचा साठा पकडला
तूलिकाची आई अमृता यांनी सांगितले की, जेव्हा त्यांच्या पतीचा मृत्यू झाला तेव्हा तूलिका फक्त २ वर्षांची होती. सुरूवातीला नोकरीच्या व्यस्ततेमुळे तूलिकाला घराजवळील एका क्लबमध्ये भरती केले. तिथे कष्ट करत, घाम गाळत आज तूलिकाने देशाचे नाव मोठे केले आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की तूलिकाने अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे ही त्यांची इच्छा होती पण तिचे लक्ष ज्युडो खेळण्यावर होते.

ED म्हणाली – आम्ही त्यांना AC खोलीत ठेवलं, राऊत म्हणाले – ‘मी फक्त पंखाच पाहिला’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here