मुंबई :प्रियांका चोप्रा आणि निक जोनस आदर्श जोडी समजली जाते. अनेक जणांचा ते दोघं आदर्श आहेत. प्रियांकानं फक्त अभिनय नाही,तर बिझनेसमध्येही आपलं नाव कमावलं आहे. त्यांची एकूण संपत्तीही अनेक कोटी आहे. तरीही प्रियांका निक जोनसचे कपडे चोरते. खुद्द प्रियांकानंच हे सांगितलंय. तिनं सांगितलं की ती निकचे कपडे आणि गाॅगल्स चोरून वापरते. पण शूज नाही चोरू शकत. त्याचं कारणही तिनं दिलंय.

Citadel च्या शूटिंगला अनेकदा निक जोनसच्या कपड्यात दिसली
प्रियांका चोप्रा Citadel या वेब सीरिजचं शूटिंग करतेय. शूटिंगच्या वेळी अनेकदा तिनं निक जोनसचे कपडे घातलेले, दिसले आहेत. तिनं Elite Daily ला दिलेल्या मुलाखतीत यामागचं कारणही सांगितलं आहे.

शरद पवारांवरील वक्तव्य अन् शिवप्रेमींवर टीका; केतकीची वादग्रस्त विधानं पुन्हा चर्चेत

पतीचे कपडे चोरण्यामागचं सांगितलं कारण
प्रियांका चोप्रा म्हणाली, ‘मी नेहमी निकचे कपडे घालते. फक्त त्याचे शूज मला होत नाहीत, म्हणून. तो काॅर्डस आणि सेट्स घालतो, मी त्याचं जॅकेट घालते. त्याचे सनग्लासेसही मी चोरते. निककडे छान कपडे आहेत. तुम्हाला कधी कळणारच नाही की मी त्याचे कपडे घातले आहेत.

प्रियांका आणि निक

निकनं साजरा केला प्रियांकाचा वाढदिवस
आपल्या लाडक्या बायकोचा वाढदिवस निक जोनसनं अत्यंत खास आणि रोमँटिक पद्धतीनं साजरा केला. प्रियांकाच्या वाढदिवसानिमित्तानं ती आणि तिचा नवरा, प्रसिद्ध अमेरिकन पॉप गायक निक जोनस (Nick Jonas) खास ठिकाणी गेले. तिथले त्या दोघांचे रोमँटिक अंदाजातील फोटो निकनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले. या फोटोमध्ये निक आणि प्रियांका एकमेकांना किस करताना दिसले. हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला.

प्रियांका आणि निक

निकनं त्याच्या लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छाही तितक्यात रोमँटिक अंदाजामध्ये दिल्या. निकनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं की, ‘ जुलै महिन्यात जन्मलेल्या माझ्या आयुष्यातील सर्वात लाडक्या आणि महत्त्वाच्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आयुष्याच्या चढउतार असलेल्या या प्रवासामध्ये तुझी साथ मिळाल्यानं मी स्वतःला भाग्यशाली समजतो. आय लव्ह यू.’

Video:मंगळागौरीचे खेळ खेळताना अचानक अरुंधतीला आलं रडू, आशुतोषच्या आईनं दिला आधार

म्हणजे सेक्सी असणे नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here