सांगली : जिल्ह्याच्या पलूस तालुक्यातील औदुंबर-भिलवडी-चोपडेवाडी नदीकाठी निसर्गप्रेमींना जवळपास १० लहान मोठ्या मगरी पाहायला मिळाल्या आहेत. यंदा कृष्णा नदीची पाणीपातळी स्थिर असल्याने मगरींच्या स्थलांतराला थांबा मिळाला आहे. गेल्या काही वर्षांत २० जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान कृष्णा नदीत पूरस्थिती असायची. यंदा मात्र पाणीपातळी स्थिर असल्याने मगरींनी आपला अधिवास सोडलेला नाही.

सांगलीच्या कृष्णा नदीच्या पात्रामध्ये मगरींच्या अस्तित्व वर्षानुवर्षांपासून आहे. अगदी ब्रिटिश काळातील गॅझेटमध्ये देखील कृष्णा नदीपात्रामध्ये असणाऱ्या मगरींच्या अस्तित्वाचं उल्लेख आहे. काही वर्षांपूर्वी वन विभागाकडून करण्यात आलेल्या एका सर्वेमध्ये हरिपूर पासून औदुंबरच्या डोहापर्यंत ५०हून अधिक मगरी व पिल्लं अस्तित्वात असल्याचं समोर आलं होतं. आतापर्यंत आलेल्या तीन महापूरांमुळे मोठ्या प्रमाणात मगरींचे स्थलांतर झालं आहे. मात्र, मगरींचे प्रजनन यामुळे औदुंबर डोहातील मगरींचे अस्तित्व कायम आहे.

निष्ठेचे दुसरे नाव…; मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यात झळकलेल्या बॅनरची राज्यभर चर्चा
मगरींचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

दोन दिवसांपूर्वी पलूस तालुक्यातील चोपडेवाडी येथील ग्रामदैवत लक्ष्मी यात्रेनिमित्त बोटीतून औदुंबर-भिलवडी-चोपडेवाडी प्रवासादरम्यान निसर्गप्रेमींना जवळपास दहा लहान मोठ्या मगरींचा अधिवास पहायला मिळाला. या मगरींचा आकार साधारण सहा फुटांपासून ते १४ फुटांपर्यंत आहे. मगरींचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी वनखात्याने मगरींचा बंदोबस्त करावा अशी मागणी सातत्याने ग्रामस्थांकडून केली जात आहे. नदीकाठी संरक्षक जाळी, नदीवर वीज व्यवस्था करावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून वन विभागाकडे करत आहे. परंतु अद्याप ही मागणी पूर्ण होऊ शकलेली नाही. या मगरींमुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे.

मगरींची नदी म्हणून कृष्णा नदीची ओळख

कृष्णा नदीच्या पात्रामध्ये अनेक ठिकाणी मगरींचा अधिवास आहे. कृष्णा नदी ही मगरींची नदी म्हणूनच ओळखली जाते. सांगली जिल्ह्यात मगरीची आजही दहशत आहे. याच परिसरात अनेक वेळा मगरींकडून हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये काही जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर मगरींनीही अनेक प्राण्यांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नदीकाठी असलेल्या गावकऱ्यांना तसेच किनाऱ्याला लागून असलेल्या शेतात शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावं लागतं. उन्हाळ्यात दुपारच्या वेळी या मगरी नदी पात्राबाहेर पडत असतात. त्यामुळे आसपासच्या गावांना या मगरीपासून बचाव करावा लागतो.

Commonwealth Games 2022 7th Day Live: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा,सातव्या दिवसाचे लाइव्ह अपडेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here