Pune Latest Accident News : पुणे-सातारा महामार्गावर एस. टी चालकाचा हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र, जीवाची बाजी लावत त्यांनी २५ प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत.

हायलाइट्स:
- एस.टी चालकाचा बस चालवचा चालवात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
- प्रसंगावधान दाखवत २५ प्रवाशांचे प्राण वाचवले
- पुणे- सातारा महामार्गावरील घटना
जालिंदर रंगाराव पवार हे मुळचे सातारा जिल्ह्यातील, खटाव तालुक्यातील पळशी गावाचे होते. ते राज्य परिवहन महामंडळाची पालघर विभागाच्या वसई आगाराची एसटी बस म्हसवडकडे घेऊन जात होते. पुणे-सातारा महामार्गावरील नसरापूर गावाच्या हद्दीत बस आल्यानंतर जालिंदर पवार यांना चक्कर येत असल्याचे जाणवले. पण आपल्यावर २५ प्रवाशांची जबाबदारी असल्याची जाणीव ही जालिंदर पवारांना होती. त्यामुळे त्यांनी क्षणाचाही विचार न करता बस रस्त्याच्या कडेला घेतली. त्यामुळे बसमधील २५ प्रवाशांचे प्राण वाचले. याप्रकरणी बसचे वाहक संतोष गवळी यांनी नसरापूरच्या राजगड पोलीस स्टेशनमध्ये याबाबत माहिती दिली.
दुपारी साडेबारा वाजता बस स्वारगेट आगारात होती. यावेळी जालिंदर पवार यांची संतोष कांबळे यांनी बदली चालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. खेड शिवापूरचा टोलनाका ओलांडल्यानंतर बसचा वेग मंदावला त्यावेळेस वाहकाने चालकाला विचारणा केली तेव्हा चक्कर येतं असल्याचं सांगत चालकाने बस रस्त्याच्या कडेला घेतली. वाहकाने पवार यांना पुन्हा आवाज दिला मात्र पवार यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर वाहकाने प्रवाशांच्या मदतीने पवार यांना नसरापूर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, २५ प्रवाशांचे जीव वाचवणाऱ्या या देवदूताच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.