India’s Sudhir wins the 1st ever gold medal in Para Powerlifting at Commonwealth Games : भारताच्या सुधीरने पॅरा पॉवरलिफ्टिंग पुरुषांच्या हेवीवेट फायनलमध्ये १३४.५ गुणांसह सुवर्णपदकाला गवसणी घातली. सुधीरने पहिल्या प्रयत्नात २०८ किलो वजन उचलले आणि १३४.५ गुण मिळवत विक्रम रचला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात २१२ किलो वजन उचलले आणि सुवर्णपदक आपल्या नावावर केले.

श्रीशंकरने पटकावले रौप्यपदक
भारताच्या मुरली श्रीशंकरने पुरुषांच्या लांब उडीत ८.०८ मीटर अंतरासह ऐतिहासिक रौप्यपदक जिंकले. केरळमधील पलक्कड येथील २३ वर्षीय हा लांब उडीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला पुरुष भारतीय खेळाडू ठरला आहे. या स्पर्धेत श्रीशंकर हा सहावा होता. पण फक्त एकाच दमदार उडीच्या जोरावर त्याने दुसरा क्रमांक गाठला आणि रौप्यपदकाला गवसणी घातली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत लांब उडीत भारताच्या दोन महिलांनी पदक जिंकले होते, पण पुरुषांमध्ये पदक जिंकणारा श्रीशंकर हा पहिलाच भारतीय ठरला. श्रीशंकरला पदक मिळवण्यात यश आले. पण हे यश श्रीशंकरला खडतर संघर्षानंतर मिळाले आहे. कारण श्रीशंकरची चौथ्या प्रयत्नात ८ मीटरची लांब उडी अवैध ठरवण्यात आली. पण त्याने हार मानली नाही आणि पुढच्या प्रयत्नामध्ये त्याने नेत्रदीपक कामगिरी करून दाखवली. पाचव्या प्रयत्नात ८.०८ मीटर लांब उडी मारून सहाव्या क्रमांकावरून थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.