मुंबई : कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्या टोळीतील सलीम फ्रुट याला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गुरुवारी अटक केली. दाऊदसाठी हवाला रक्कमेची फेरफार करत असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे. माजी मंत्री नवाब मलिक प्रकरणातही सलीम फ्रुट याचे नाव समोर आले होते.

एनआयएने ताब्यात घेतलेल्या सलीम फ्रुट याचं खरं नाव सलीम मोहम्मद इक्बाल कुरेशी असं असून त्याला मुंबई सेंट्रलमधील अरब लेन भागातून अटक करण्यात आली आहे. कुख्यात दाऊद इब्राहिम कासकर व त्याच्या साथीदारांद्वारे तस्करी, अमली पदार्थांद्वारे दहशतवादी कृत्य, मनी लाँड्रिंग, दहशतवादी कारवायांसाठी निधी जमा करणे, त्यासाठी मालमत्तेचा अनधिकृत ताबा घेऊन तो निधी लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि अल कायदासारख्या संघटनांना पुरवणे, अशा कृत्यात सलीम फ्रुट सहभागी असल्याची माहिती एनआयएच्या तपासात समोर आली आहे. त्यावरून ही कारवाई करण्यात आल्याचे एनआयएने म्हटलं आहे.

मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त कधी; आमदारांची यादी अमित शहांकडे, भाजपकडून पुन्हा धक्कातंत्र?

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here