married women commits suicide with his boyfriend: कारंजा तालुक्यातील पिंप्री वन परिसरातील अडाण धरणात एक महिला व एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. अडाण धरणात कारंजा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ एका महिलेचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांकडून सर्वधर्म आपत्कालीन संस्थेच्या सदस्यांना बोलावून त्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.

खुशी आणि शंकर प्रेमी युगल असल्याची परिसरात चर्चा आहे. प्रेमाला घरच्यांचा विरोध होईल या भीतीने त्यांनी आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. शंकरचे वय अंदाजे २६ वर्षे असून खुशीचे वय अंदाजे २३ वर्षे आहे. खुशी विवाहित होती व काही दिवसांपूर्वीच करंजात माहेरी आली होती. शंकरसोबत तिची जुनी ओळख होती. आज दोघे भेटून धरणावर फिरायला गेले व एकमेकांशी लग्न न झाल्याने नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.