मिळालेल्या माहितीनुसार, ही स्फोटकं कुठून आली, काय उद्देशाने ती ठेवण्यात आली होती, यामागे काही मोठ्या कटाचा डाव होता का?, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आता तपास सुरू आहे. सध्या आरोपी समशेर सिंगला उद्या न्यायालयात हजर करून चौकशीसाठी कोठडी घेण्यात येणार असून आरोपीविरुद्ध शहााबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरीकडे, आरडीएक्स जप्त केल्यानंतर बॉम्ब निकामी पथकाच्या तांत्रिक पथकाने राष्ट्रीय महामार्ग काही काळासाठी बंद करून काळजीपूर्वक हा स्फोटक पदार्थ घटनास्थळी निकामी केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरडीएक्सचे प्रमाण एक ते दीड किलो इतके सांगितले जात आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप या संदर्भात दुजोरा दिलेला नाही.
एसपी कर्ण गोयल म्हणाले की, दहशतवाद्यांसह आरडीएक्स जप्त करणं हे एसटीएफचं मोठं यश आहे. या घटनेमागील त्याचा नापाक हेतू जाणून घेण्यासाठी आरोपी तरुणाची चौकशी सुरू आहे. शहााबादमध्ये आरडीएक्स कसं पोहोचलं, तरुण कोणत्या दहशतवाद्यांशी संबंधित आहे, हे तपासानंतरच समोर येईल.