पाटणा : बिहारची राजधानी पाटणा इथे एका घटनेनं सगळ्यांची झोप उडवली आहे. हे प्रकरण सोशल मीडियावरील चॅटिंग आणि ऑनलाईन व्हिडिओ कॉलिंग चॅटशी संबंधित आहे. पीडितेने महिला हेल्पलाईनवर तक्रार करत होणार त्रास सांगितल्यानंतर आरोपीचे गंभीर कृत्य उघडकीस आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहेय

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा फार्मासिस्ट आहे. तो आधी तरुण मुलींशी मैत्री करायचा, त्यानंतर त्यांच्याशी मोबाईलवर चॅटिंग करून गप्पा मारायचा. अशाने मुली त्याच्या जाळ्यात अडकायच्या आणि तोच हा तरूण त्यांच्याशी अश्लील कृत करत असे. मुलींना व्हिडिओ कॉल करून चक्क त्यांचे न्यूड फोटो आणि व्हीडिओ तयार करू लागला होता.

Beed: शिक्षक पतीला सहकारी शिक्षिकेसोबत सेक्स करताना पकडलं, बीडमध्ये पुढे काय झालं पाहाच…
आरोपी फोनवर मुलींशी असं बोलायचा जणू तो त्यांच्यासाठीच बनला आहे. जेव्हा व्हिडिओ कॉलवर बोलणं सुरू होतं तेव्हा तो मुलींना कपडे काढायला सांगायचा. मग तो मुलीला उठून चालायला सांगायचा. या दरम्यान तो त्याचा न्यूड व्हिडिओ रेकॉर्ड करत असे. व्हिडिओचे स्क्रीन शॉट्स घेतल्यानंतर तो मुलींना पाठवायचा आणि त्यांना स्वतःकडे बोलावायचा.

अशा प्रकारे आरोपीने अनेक मुलींना ब्लॅकमेल केलं आहे. घरी बोलावून तो महिलांना शारीरिक संबंध ठेवण्यास सांगायचा. आरोपीसोबत काम करणाऱ्या मुलाची बहीण जेव्हा या प्रकरणात त्याची शिकार झाली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. राहुल कुमार असं आरोपीचं नाव असून तो पाटलीपुत्र परिसरातील एका खासगी रुग्णालयात फार्मासिस्ट आहे.

मुंबईत थरार! चक्कर आली अन् पाचव्या मजल्यावरून पडली, अर्धा तास चौथ्या मजल्यावर झुलत राहिली अन्…
पीडित तरुणीने महिला हेल्पलाइनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिला हेल्पलाइनने आरोपींना नोटीस पाठवली. यानंतर कारवाईमध्ये धक्कादायक माहिती समोर आली. मोबाईलची झडती घेतली असता, त्यामध्ये १० मुलींचे नग्न व्हिडीओ सापडले असून, ते जून आणि जुलै महिन्यातच रेकॉर्ड करण्यात आले आहेत.

पुणेकर आता हवेत उडणार, माणसाला घेऊन भरारी घेणारा ड्रोन तयार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here