school student conspires his kidnapping police solves case: एखाद्या चित्रपटातील कथानक फेल व्हावं असं प्लॅनिंग चंद्रपूरातील विध्यार्थ्याने केले. शाळेला सुट्टी मारल्याने पालक रागवू नये यासाठी या पठ्ठ्याने चक्क स्वत:चाच अपहरणाचा बनाव रचला.

 

school student plots his kidnapping
विद्यार्थ्यानं स्वत:च्याच हत्येचा बनाव रचला
चंद्रपूर: एखाद्या चित्रपटातील कथानक फेल व्हावं असं प्लॅनिंग चंद्रपूरातील विध्यार्थ्याने केले. शाळेला सुट्टी मारल्याने पालक रागवू नये यासाठी या पठ्ठ्याने चक्क स्वत:चाच अपहरणाचा बनाव रचला. एका मालवाहू चालकाने अपहरण केलं. मात्र मी कसाबसा सुटलो अशी कथा त्याने घरच्यांना सांगितली. प्रकरण पोलिसात गेलं. सत्य समोर येताच पोलिसांनी कपाळावर हात मारला. या अपहरणाच्या बनावट स्टोरीने चंद्रपुरात खळबळ उडाली.

चंद्रपूर शहरालगतच्या पडोली येथील एका दहा वर्षाच्या मुलाने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला. शाळेला दांडी मारल्याने पालक रागावू नये म्हणून त्याने स्वत:च्या अपहरणाची कहाणी तयार केली. टीव्हीवरचे क्राईम शो पाहून त्याने ही कथा रचल्याचे तपासात उघड झाले. मुलगा घरी पोहोचल्यावर त्याला पालकांनी शाळेतून उशिरा येण्याचे कारण विचारले. त्यावर मुलाने आपले एका मालवाहू चालकाने अपहरण केले. आपण त्याच्या तावडीतून कसेबसे सुटलो अशी कहाणी सांगितली.
बिल्डिंगमधील ‘महिला’ पॉर्न पाठवायची, १० शेजाऱ्यांनी मैत्री केली अन् पायाखालची जमीन सरकली
प्रकरण पोलीस ठाण्यात गेले. तिथेही पठ्ठ्याने हीच कहाणी वारंवार सांगितली. त्यानुसार पोलिसांनी गांभीर्य दाखवत मुलाने सांगितलेल्या मेटाडोरचा नंबर व चालकाची महामार्ग तपासणी केली. सीसीटीव्ही फुटेज शोधल्यानंतरदेखील तपास पथकाच्या हाती सुगावा लागला नाही. अखेर काही तासांनी पोलिसांनी विश्वासात घेऊन माहिती काढल्यावर खरी कहाणी पुढे आली. सत्य समोर येताच पोलिसही चक्रावले.
तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे, ३५ लाख द्या! मित्रांनीच केलं अपहरण, शेवट भयानक झाला
कोवळ्या मुलाला अशी क्लृप्ती सुचते कशी?, असा प्रश्न पोलिसांना पडला. मुलाच्या या पराक्रमाने पालकही बुचकाड्यात पडले. अगदी सहज पाहायला मिळणाऱ्या टीव्हीवरील क्राईम सिरीयल आणि हातात असलेले मोबाईलवरचे गुन्हे विषयक कार्यक्रम आणि गेम्स यामुळे अल्पवयीन मनांवर किती खोलवर परिणाम केला याचे हे ताजे उदाहरण म्हणायला हवे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here