मुंबई : मुंबई पोलि‍सांनी गुरूवारी मोठी कारवाई करत तब्बल ७०० किलो एमडी जप्त केला आहे. त्याची एकूण किंमत १४०० कोटींच्या आसपास आहे. ही व्यसनी लोकांसाठी वाईट बातमी असली तरी आरोग्याच्या आणि तरुणांच्या हिताच्या दृष्टीने ही चांगली बातमी आहे. मुंबई पोलि‍सांच्या अँटी नार्कोटिक सेलला मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा परिसरात छापा टाकून या मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाई दरम्यान पोलि‍सांनी पाच आरोपींना अटकही केली आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यापासून ते आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या सगळ्याच्या मागे एक ५२ वर्षाच्या व्यक्तीचा हात आहे. ज्याने रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. गेल्या खूप दिवसांपासून तो एमडी बनवत असून या घटनेवरून थेट ‘ब्रेकिंग बॅड’ ही वेब सीरिज आठवते. एमडी म्हणजे मेफेड्रोन जे एका प्रकारचं विशेष औषध आहे.

मुलींना कपडे काढून चालायला सांगायचा नंतर Nude Video…; फार्मसिस्ट तरुणाचं कारस्थान वाचून हादराल
फार्मा कंपनीत मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम

मूळच्या उत्तर प्रदेशच्या असलेल्या आरोपी कुमार याने १९९७ मध्ये मुंबईत येण्यापूर्वी पूर्वांचल विद्यापीठातून ऑरगॅनिक रसायनशास्त्रात एमएससी केलं. सुरुवातीला तो नालासोपारा इथं राहत होता. त्याने एका फार्मा कंपनीत मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून कामही केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे १५ वर्षांच्या अनुभवानंतर, त्याने बंदी घातलेली औषधं विकण्यास सुरुवात केली. यामुळे त्याचा थेट गुन्हेगारांशी संपर्क वाढला आणि त्याचा हा अवैध व्यवसाय वाढत गेला. काही वर्षांतच, तो एमडी हवं असणाऱ्या लोकांच्या संपर्कात आला. त्याने एमडी विकण्यास छोट्या पातळीवर सुरुवात केली. पण यानंतर त्याने जे केलं ते भयंकरच होतं.

आरोपी कुमार याने पालघरमध्ये भाड्याने केमिकल युनिट विकत घेतलं जिथे त्याने थेट बॅचमध्ये एमडी तयार करण्यास सुरुवात केली. पण त्याआधी त्याने दर्जेदार एमडी बनवण्याची चोख कला शिकली. २०१८ किंवा २०१९ च्या आसपास त्याने एमडी तयार करण्यास सुरुवात केली. अशी माहिती DCP दत्ता नलावडे यांनी दिली आहे.

Beed: शिक्षक पतीला सहकारी शिक्षिकेसोबत सेक्स करताना पकडलं, बीडमध्ये पुढे काय झालं पाहाच…
जीवनावश्यक वस्तूंपेक्षा ड्रग्जचीच किंमत जास्त
कुमार याने एमडी बनवण्यास सुरुवात केली तेव्हा त्याने २०० किलोग्रॅम एमडी विकला. त्यानंतर ४००, आणि नंतर हेच वाढवत त्याने थेट ७०० किलोग्रॅम एमडी शहरांमध्ये विकला आहे. सामान्य घरातून असणाऱ्या कुमारने या व्यवसायातून करोडो रुपये कमवले. फक्त दोन वर्षामध्ये त्याने १२०० किलोग्रॅम एमडी विकला, ज्यातून त्याने २० कोटी कमवले. खरंतर, सध्या जीवनावश्यक वस्तूंपेक्षा ड्रग्जचीच किंमत जास्त असल्याचं पाहायला मिळत आहे.

या व्यवसायातून कुमार याने यूपी आणि गुजरातमध्ये अनेक मालमत्ता खरेदी केल्या आहेत. या सर्व व्यवहार आणि मालमत्तांचा तपास सध्या सुरू आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, मार्चमध्ये एएनसीच्या वरळी युनिटने मानखुर्द इते सापळा रचून शमसुल्लाला २५० ग्रॅम एमडीसह अटक केली.

हॉटेलमध्ये सुरू होतं हायप्रोफाईल सेक्स रॅकेट, पोलीस जाताच हादरले; १२ मुली ताब्यात
शहर पोलिसांनी अलीकडच्या काळात केलेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे. मेफेड्रॉनला ‘म्याऊ म्याऊ’ किंवा एमडी असेही म्हणतात. नॅशनल नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्यानुसार त्यावर बंदी आहे.

नवी मुंबईत ३६२ कोटी रुपयांचे हिरोईन जप्त
याआधी १५ जुलै रोजी नवी मुंबईतील गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. नवी मुंबई गुन्हे शाखेने कोट्यावधींचे हिरोईन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या हिरोईनची किंमत ३६२.५ कोटी एवढी आहे. ड्रग्जची खेप असलेला हा कंटेनर दुबईहून नवी मुंबईच्या न्हावाशेवा बंदरात आला होता. हा कंटेनर नवकार लॉजिस्टिकच्या पनवेलजवळील अजिवली गावातील असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. जप्त करण्यात आलेली हिरोईनची खेप ही आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेट नेटवर्कच्या सप्लाय चेनचा भाग असल्याचे गुन्हे शाखेच्या पथकाने उघड केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here