Maharashtra Amravati Latest Accident News : अमरावती जिल्ह्यात सातत्याने मोठ्या प्रमाणात अपघाताची मालिका सुरू आहे. अशातच आज नागपूर औरंगाबाद महामार्गावर दोन ट्रकांची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

 

Maharashtra Amravati Latest Accident News
दोन ट्रक समोरासमोर धडकले, चौघांचा जागीच मृत्यू, लोखंडी रॉड शरीरातून आरपार

हायलाइट्स:

  • नागपूर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात
  • दोन ट्रकांची समोरासमोर जोरदार धडक
  • अपघातात चौघांचा जागीच मृत्यू
अमरावती : जिल्ह्यात सातत्याने मोठ्या प्रमाणात अपघाताची मालिका सुरू आहे. अशातच आज नागपूर-औरंगाबाद महामार्गावर दोन ट्रकांची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

नागपूर अमरावती महामार्गावर लोखंडी रॉड घेऊन जाणारा ट्रक खड्डे वाचवण्याच्या नादात अनियंत्रित झाला. त्यामुळे हा ट्रक समोरून येणाऱ्या ट्रकला जोरधार धडकला. अनियंत्रित ट्रक समोरून येणाऱ्या ट्रकवर धडकल्याने दोन्ही ट्रक मधील ड्रायव्हर व क्लिनर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्हीही ट्रकचा पुढील भागाचा पूर्णतः चेंदामेंदा झाला असून ट्रक मधील लोखंडी रॉड हे काचेतून बाहेर आले आहेत. लोखंडी रॉड शरीरातून आरपार गेल्याने चौघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सत्तांतरानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुका, सोलापुरात उद्धव ठाकरेंचा भाजपला दणका
या अपघातामुळे नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक तुंबली असून सुमारे आठ किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

नाइट क्लबमध्ये भीषण अग्नितांडव; १३ जणांचा होरपळून मृत्यू, ४० गंभीर जखमी

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here