rape case today, रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या तरुणीसोबत जंगलात घडलं भयंकर; मदतीच्या बहाण्याने… – gang raped on women while promising to help bhandara crime news
भंडारा : भंडाऱ्यात घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बहिणीशी किरकोळ कारणावरून वाद झाल्याने रागाच्या घरात बाहेर पडणाऱ्या ३५ वर्षीय तरुणीवर दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं असून तपास सुरू असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी गेल्या अनेक महिन्यांपासून बहिणीसोबत माहेरी राहत होती. दोघींमध्ये झालेल्या शुल्लक कारणावरून पीडिता रागाच्या भरात घराबाहेर पडली. यानंतर आरोपीने तिला मदतीचे आश्वासन देत भयंकर अत्याचार केले. त्याने तिला भंडारा जिल्ह्यातील कन्हाळमोह जंगलात नेत सामूहिक बलात्कार केले. यामुळे पीडितेला गंभीर इजा झाल्या असून तिचा मृत्यूशी संघर्ष सुरू आहे. Beed: शिक्षक पतीला सहकारी शिक्षिकेसोबत सेक्स करताना पकडलं, बीडमध्ये पुढे काय झालं पाहाच… नराधम आरोपी इतक्यावरच थांबला नाही. त्याने गाडी एका ढाब्याजवळील दुचाकी दुरुस्त करणाऱ्या दुकानात नेली. दुचाकीस्वाराने पुन्हा फसवून जंगलात नेले अन् दोघांनी मिळून तिच्यावर अत्याचार केले आणि निर्वस्त्र अवस्थेत तिला फेकून पळ काढला.
कारधा पोलिसांनी पीडितेला उपचारासाठी मेडिकल कॉलेज, नागपूर येथे दाखल केले. रक्तस्राव थांबत नसल्याने डॉक्टरांनी तिच्यावर कोलोस्टॉमी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आवश्यक नमुने फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून पोलिस अधिक तपास करत आहेत.