Mumbai district bank president | मुंबै बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांनी सूत्रे हलवत भाजपाला धक्का दिला होता. सिद्धार्थ कांबळे हे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. मात्र, अवघ्या सहा महिन्यांत प्रवीण दरेकर यांनी अध्यक्षपद पुन्हा स्वत:कडे खेचून आणले आहे. यानिमित्ताने मुंबै बँकेतील राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे.

 

Pravin Darekar Mumbai Bank (1)
प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस

हायलाइट्स:

  • मुंबै बँकेच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर यांची निवड
  • सिद्धार्थ कांबळे हे उपाध्यक्ष राहणार आहेत
  • मुंबै बँकेतील राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांच्या राजकीय खेळीमुळे गमावलेले मुंबै बँकेचे अध्यक्षपद भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी पुन्हा स्वत:कडे खेचून आणले आहे. राज्यातील सत्तातंरानंतर मुंबै बँकेतही सत्तापालट होणार, अशी चर्चा होती. मुंबै बँकेचे (Mumbai district Bank) अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे आणि उपाध्यक्ष विठ्ठल भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शुक्रवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मुंबै बँकेच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर यांची निवड करण्यात आली. तर सिद्दार्थ कांबळे हे उपाध्यक्ष राहणार आहेत. यानिमित्ताने मुंबै बँकेतील राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे.
राऊत कुटुंबाभोवती ईडीने फास आवळला, शरद पवार धीर देण्यासाठी मैत्री बंगल्यावर जाणार?
जानेवारी महिन्यात झालेल्या मुंबै बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनलने सर्वच्या सर्व २१ जागा जिंकल्या होत्या. १७ जागा अगोदरच बिनविरोध निवडून आल्या होत्या. तर चार जागांसाठी निवडणूक पार पडली होती. तर चार जागांसाठी निवडणूक पार पडली होती. यामध्येही प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनलने बाजी मारली होती. त्यामुळे प्रवीण दरेकर हेच पुन्हा मुंबै बँकेचे अध्यक्ष होतील, असे सांगितले जात होते. परंतु, मुंबै बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांनी सूत्रे हलवत भाजपाला धक्का दिला होता. सिद्धार्थ कांबळे हे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. मात्र, अवघ्या सहा महिन्यांत प्रवीण दरेकर यांनी अध्यक्षपद पुन्हा स्वत:कडे खेचून आणले आहे.

मुंबै बँक प्रकरणात प्रवीण दरेकर यांच्यावर गु्न्हा

प्रत्यक्षात मजूर नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे मजूर असल्याचं दाखवून आणि १९९९ पासून २०२१ पर्यंत मुंबै बँकेच्या संचालक मंडळावर मजूर प्रवर्गातून निवडून येऊन नागरिकांबरोबरच सरकारचीही फसवणूक केली, अशा आरोपाखाली प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रोहित पवारांच्या नाकाखालून तीन ग्रामपंचायती काढल्या, राम शिंदेंचं कर्जतमध्ये वर्चस्व
गेली अनेक वर्षे दरेकर हे बँकेचे अध्यक्ष असून मजूर या वर्गातूनच ते निवडून येत आहेत. मजूर सहकारी संस्थांच्या उपविधित मजुराची व्याख्या दिलेली आहे. अंगमेहनत करणारी व्यक्ती ही मजूर म्हणून गणली जाते. शारीरिक श्रमातून मजुरी करणारा असला पाहिजे, असेही या उपविधीत नमूद आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर कोणत्या अंगाने मजूर वर्गात मोडतात, हा प्रश्न उपस्थित झाला होता.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here