जळगाव : पारोळा तालुक्यातील करंजी बुद्रुक इथे आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अचानक ढगफुटी सदृश पाऊस झाला. यामुळे अनेक घरांमध्ये पाणी घुसले असून तीन ते चार घरं पडून नुकसान झालं आहे. गावातील धोक्याच्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी वेळीच घरे खाली केल्याने नुकसान व दुर्घटना टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, शेवगे प्रगणे भहाळ, हिवरखेडे, मुंदाणे, सोके, मुंदाने प्र उ या भागात ढगफुटीसारखा पाऊस पडल्यामुळे मुंदाने गावाजवळील फरशी पुलावरून पाणी भरून नवनाथ बाबा नाल्याद्वारे सदर पाणी हे करंजी गावात घुसले. करंजी गावातील बळीराम ताराचंद भील’, शरद बंसीलाल भील, नंदु मोहन माळी, प्रकाश मोहन माळी, दिलीप भील, रमेश बंसीलाल भील, दत्तू महादू माळी, संजय हिम्मतराव पाटील, साहेबराव महादू पाटील, यांच्यासह बऱ्याच जणांच्या घरात आणि शेतांमध्ये पाणी घुसून मोठे नुकसान झालेले आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या तरुणीसोबत जंगलात घडलं भयंकर; मदतीच्या बहाण्याने…
महसूल विभागाचे अधिकारी आणि तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केले तर पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव यांच्यासह बिट अंमलदार यांनी करंजी गावाला भेट दिली. करंजीसह आजूबाजूच्या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडल्यामुळे अनेक गावातही नुकसान झाले आहे. या ठिकाणीही पंचनामा करण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थ यांनी केली आहे.

Crime News Today : मुलींना कपडे काढून चालायला सांगायचा नंतर Nude Video…; फार्मसिस्ट तरुणाचं कारस्थान वाचून हादराल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here