मालिकांमध्ये जरा करण दिसतो, तसा तो खऱ्या आयुष्यात नाही. मी त्याच्या करिअरवर परिणाम होईल म्हणून गप्प बसले होते. पण आता वेळ आली आहे, खरं काय ते सर्वांसमोर यायला हवं. त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचं त्यानं सांगितल्यानंतरही मी नात्याला आणखी एक संधी देण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण त्याच्याकडून काही सकारात्माक असं काही घडलंच नाही. त्यामुळं आम्ही घटस्फोटाच्या निर्यावर आलो’, असा खुलासा निशानं यावेळी केला होता. पण या प्रकरणात वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत.
आता करणनं देखील निशावर गंभीर आरोप केले आहेत. निशाचे विवाहबाह्य संबंध असल्याचं करणनं एका मुलाखतीत सांगितलं होतं. आता पुन्हा एकदा करणनं निशाच्या अफेयर भाष्य केलंय. ‘मानलेला भाऊ म्हणायची आणि आता त्याच्या सोबतच अफेयर आहे. मी आता काही गप्प बसणार नाही, कारण माझ्याकडं पुरावे आहेत’, असं करण म्हणाला.
त्याचं नाव रोहित सेठिया असून गेल्या काही महिन्यांपासून निशाचं त्याच्यासोबत एक्स्टा मॅरेटिअल अफेअर सुरू आहे. तो निशासोबत राहतोय जिथं मी राहत होतो. हा जो कोणी व्यक्ती आहे, त्याचंही लग्न झालं असून बायको आणि मुलांना सोडून तो निशासोबत राहतोय, असं करणनं सांगितलं आहे.
करण आणि निशा टीव्ही इंडस्ट्रीतील परफेक्ट कपल म्हणून ओळखलं जात होतं. २००८मध्ये ‘हंसते-हंसते’ चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली. सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंचर २०१२मध्ये दोघांनी लग्न केलं. तर २०१७मध्ये निशानं मुलगा कविश याला जन्म दिला.