मुंबई : अक्षय कुमारचा रक्षाबंधन हा सिनेमा येत्या ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्याच मुर्हूतावर प्रदर्शित होत आहे. भावा-बहिणीच्या अलवार नात्यावर हा सिनेमा आधारीत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये अक्षय कुमार व्यग्र आहे. या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी तो ‘सुपरस्टार सिंगर २’ कार्यक्रमात सहभागी झाला होता. या कार्यक्रमात अक्षयला एक व्हिडिओ दाखवण्यात आला. तो व्हिडिओ पाहून अक्षय खूपच भावुक झाला आणि त्याला अश्रू अनावर झाले.

लातूरच्या देशमुख कुटुंबात कशी रमली मुंबईची जिनिलिया डिसूजा

काय झालं नेमकं

‘सुपरस्टार सिंगर २’ कार्यक्रमात पाहुणा म्हणून अक्षय कुमार सहभागी झाला. त्यावेळी कार्यक्रमातील काही स्पर्धकांनी ‘फुलों का तारो का सबका कहना है… ‘ हे भाव-बहिणीचं नातं सांगणारं अजरामर असं गाणं गायलं. हे गाणं सुरू असताना एक व्हिडिओ दाखवण्यात आला. त्यामध्ये अक्षय कुमार आणि त्याच्या बहिणीचे फोटो होते. त्यानंतर बहिणीच्या आवाज असलेला एक व्हिडिओ दाखवण्यात आला. त्यामध्ये त्या दोघांचेही बालपणीचे फोटो होतो.


हे सर्व पाहून अक्षय कुमार खूपच भावुक झाला आणि त्याला रडायला आलं. अक्षयची बहिणी अलका हिनं अक्षयचे आभार मानले. त्यानं तिच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगामध्ये खंबीरपणं साथ दिल्याबद्दल त्याचं भरभरून कौतुक केलं. एक भाऊ म्हणून त्यानं मला कायमच साथ दिली. वेळप्रसंगी तो माझ्यासाठी वडील आणि मित्र झाला, असंही अलका यांनी सांगितलं. हे सगळं ऐकून अक्षयला रडू आवरलं नाही आणि त्यानं गळ्यात असलेल्या स्कार्फनं डोळे पुसले.

जिनिलिया डिसूजाच्या नावाची आहे अजब कहाणी, कोट्यवधींची आहे मालकीण

या सगळ्यावर अक्षयनं सांगितलं की, ‘भावा-बहिणीचं नातं हे अतिशय अद्भूत असतं. तुमची बहिण तुमची सर्वात चांगली मित्र असतो. तुम्ही तिच्या खांद्यावर डोकं ठेवून तिच्याशी अनेक गोष्टी विश्वासानं शेअर करू शकता. ती कायम तुमच्यासाठी असते. तुमच्यावर बहिणीइतकं निस्वार्थी प्रेम कुणीच करू शकत नाही.’


बालपणीच्या आठवणींन उजाळा

याचा कार्यक्रमात अक्षयनं त्याच्या बालपणीच्याही काही आठवणींना उजाळा दिला. त्यानं सांगितलं की, ‘ लहान असताना आम्ही सर्वजण एक छोट्याशा घरात रहात होतो. परंतु देवीचा (अलका) आमच्या आयुष्यात प्रवेश झाला आणि सर्व काही बदललं.’

अक्षय- अल्का

अक्षयनं पुढं सांगितलं की, ‘लहान असताना शाळेत जाण्यासाठी आम्ही दोघं लवकर उठायचो. आम्ही दोघंजण कॅथलिक शाळेत असल्यानं रक्षाबंधनाच्या दिवशी सुट्टी नसायची. त्यावेळी आम्ही लवकर तयार व्हायचो. मी टेबलासमोरच्या खुर्चीत जाऊन बसायचो. त्यानंतर अलका येऊन माझ्या हातावर राखी बांधायची आणि आशीर्वाद घेण्यासाठी तिला नमस्कार करायचो.

अजय देवगण नव्हे तर या अभिनेत्याच्या प्रेमात वेडी झाली होती काजोल

वडील मला तेव्हा तिला देण्यासाठी पैसे द्यायचे. ते मी तिला द्यायचो आणि त्यानंतर आम्ही शाळेत जायचो. आजही तिच प्रथा आम्ही पाळत आहोत. रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून मी तिच्या घरी जातो आणि तिच्याकडून राखी बांधून घेतो आणि तिला नमस्कार करून तिच्याकडू आशrर्वाद घेतो. इतक्या वर्षांत आमच्या नात्यात काहीच फरक पडलेला नाही.’ हे ऐकल्यानंतर सेटवर असलेले सर्वचजण खूप भावुक झाले.

‘संजय माझ्याकडे नटरंगसाठी आलेला पण…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here