लग्नानंतर लंडनला स्थायीक झालेली सोनम आता मुंबईत आली आहे. कपूर कुटुंबीय आतुरतेनं बाळाची वाट पाहत आहेत. प्रेग्नंट सोनम सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिनं अनेकदा प्रेग्नंसीसंदर्भात पोस्ट शेअर केल्यात. तसंच गरोदरपणात वेगवेगळे येणारे अनुभवही तिनं चाहत्यांसोबत शेअर केलेत. आई होणं काही सोपं नसतं…असं म्हणतात ते काही खोट नाही, असं आता सोनमही म्हणतेय. तिनं शेअर केलेल्या फोटोतून हे स्पष्टपणे दिसतंय देखील.
सोनमनं इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये ती बेडवर असल्याचं पाहायला मिळतं. तिनं तिच्या पायाचा फोटो शेअर केलाय. हा फोटो शेअर करताना तिनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, गरोदरपण नेहमीच छान आणि सोपं नसतं’.

ो
लंडनमध्ये झालं डोहाळे जेवण
लंडनमध्ये पार पडलेल्या सोनमच्या बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.त्यावेळी नॅपकिन्स आणि पाहुण्यांसाठीच्या भेटी सगळंच कस्टमाइज केलं होतं. पार्टीत सोनमची बहीण रिया कपूरही आली होती. सोशल मीडियावर फोटोही शेअर केले होते.
सोनम कपूरचं आगामी सिनेमे
या वर्षी सोनमचा ब्लाइंड सिनेमा रिलीज होणार आहे. Shome Makhija नं सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. विनय पाठक आणि Lillete Dubey यांची महत्त्वाची भूमिका आहे. गेल्या वर्षी सिनेमाचं शूटिंग झालंय. या वर्षी तो रिलीज होईल.