मुंबई : श्रावण महिना म्हटलं की अनेक सण समारंभ, व्रतवैकल्यं, पूजाविधी यांची रेलचेल असते. ती मग मालिकांतही दिसायला लागते. त्यात सगळ्यांचा लाडका सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवसाची वाट आपण सगळेच बघत असतो. तसंच श्रावणात जिवतीच्या पूजेलाही महत्त्व आहे.

लवकरच कलर्स मराठीवरील योगयोगेश्वर जय शंकर मालिकेमध्ये जिवतीची पूजा आणि रक्षाबंधन विशेष भाग बघायला मिळणार आहे. ज्यामध्ये याचं महात्म्य गोष्टी रूपात सांगितलं जाणार आहे. याचसाठी मालिकेत एक विशेष एंट्री होणार आहे. ती म्हणजे सृष्टी पगारेची.

माझी तुझी रेशीमगाठ : नेहाची मंगळागौर दणक्यात, नटलेल्या परीचा गोड Video झाला व्हायरल

कलर्स मराठीवरील स्वामिनी मालिकेत रमा बनून मराठी मनावर जिने अधिराज्य गाजवलं, सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमातून जिने संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलं ती सृष्टी. या मालिकेत ती पावनीची महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

सृष्टी शूटिंग करताना

मालिकेमध्ये बाळ शंकर राहत असलेल्या गावामध्ये एक महसूल अधिकारी आणि त्यांचं कुटुंब राहायला येणार आहे. त्यांचीच मुलगी पावनी. जिचा विश्वास आहे तिचा भाऊ परत येणार आहे. असे तिला भास देखील होत आहेत. आता पावनीचे हे भास खरे आहेत का ? तिची तिच्या भाऊरायाशी भेट होईल का ? बाळ शंकर यात तिची मदत कशी करतील ? हे सगळं मालिकेच्या रक्षाबंधन विशेष भागांमध्ये बघायला मिळणार आहे.

सृष्टी सेटवर

याबद्दल बोलताना सृष्टी म्हणाली, “मी या भूमिकेसाठी खूपचं उत्सुक आहे. कारण या मालिकेद्वारे मी पुन्हा एकदा कलर्स मराठी परिवाराशी जोडली जाणार आहे. पुन्हा त्याच सोनेरी आठवणी समोर येत आहेत. तसंच आरुषसोबत काम करायला मिळतं आहे माझं भाग्य आहे. कामाबरोबर बरीच धम्माल मस्ती देखील सुरू असते आमची सेटवर. जसं रमा या भूमिकेवर संपूर्ण महाराष्ट्राने प्रेम केलं तसंच पावनीवर देखील करा आणि आमची मालिका नक्की बघा.”

बहिणीचा Video पाहून स्टेजवरच रडला अक्षय, गाण्याने अवस्था केली बिकट

‘आई कुठे काय करते’मध्ये मंगळागौर साजरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here