मुंबई : अभिनेता सिद्धार्थ जाधवचे (Siddharth Jadhav) अर्थात आपला सिद्धू. प्रचंड एनर्जी असलेला हा गुणी अभिनेता. दिसायला अगदी सर्वसामान्य असलेल्या सिद्धार्थनं त्याच्या सहजसुंदर अभिनयानं मराठी तसंच हिंदी सिनेविश्वात स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

सिद्धार्थचातमाशा लाईव्ह या सिनेमापाठोपाठ दे धक्का २ हा सिनेमा देखील प्रदर्शित झाला आहे. २००८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दे धक्का’ या सिनेमावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं होतं. त्यामुळेच दिग्दर्शक महेश मांजेरकर यांनी या सिनेमाचा दुसरा भाग आणण्याचा निर्धार केला आणि तो आता प्रत्यक्षातही आला आहे. दे धक्का २ मध्ये जाधव कुटुंब थेट लंडनला पोहोचलेल दाखवलं आहे. त्यामुळे अर्थातच या सिनेमातील काही चित्रीकरण हे लंडनमध्ये झालं आहे. लंडनमध्ये चित्रीकरण सुरू असतानाचा एक धम्माल विनोदी व्हिडिओ सिद्धूनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.


काय आहे नेमका व्हिडिओ

सिद्धार्थ जाधव मुंबईतील शिवडी परिसरात लहानाचा मोठा झाला आहे. अगदी सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला आणि वाढलेला सिद्धार्थ आज मनोरंजन विश्वातील आघाडीचा अभिनेता आहे. आज सिद्धार्थनं यशाचं शिखर गाठलं तरी त्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. तो आजही त्याचं बालपण, बालपणीचं ठिकाण शिवडी आणि तिथला परिसर विसरलेला नाही. त्यामुळे लंडनमध्ये ‘दे धक्का २’चं चित्रीकरण सुरू असतानाही त्याला शिवडीची प्रकर्षानं आठवण झाली होती. ती नेमकी कशामुळे हे या व्हिडिओमध्ये युझर्सना नक्की कळेल.

लंडनमध्ये चित्रीकरण सुरू असताना तिथल्या स्थानिक लोकांशी संवाद साधताना सिद्धार्थची चांगलीच पंचाईत झालेली या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ तिथल्या एका स्थानिक व्यक्तीशी तोडक्यामोडक्या इंग्रजीमध्ये संवाद साधताना दिसत आहे. तो त्या व्यक्तीला म्हणतो की,’ तुम्हाला मी इंग्रजी भाषेमध्ये बोललेलं समजत आहे का? पण मी इंग्रजी भाषेमध्ये बोलत असताना हे बघा माझ्याबरोबरचे इतर लोक मजा घेत आहेत. शिवडीची केवढी ती इंग्लिश.’ सिद्धार्थचं तोडक्या मोडक्या इंग्रजीमध्ये बोलताना पाहून मकरंद अनासपुरे, मेधा मांजरेकर, संजय खापरे यांना हसू आवरत नाही.
आई होणं कधी कधी…सोनम कपूरचा बेडवरचा ‘तो’ फोटो पाहून वाढली चाहत्यांची चिंता


हा व्हिडिओ सिद्धार्थनं शेअर केल्यानंतर युझर्सना हसू आवरत नाही. सिद्धार्थचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी मजेशीर कॉमेंट केल्या आहेत. त्यात सोनाली खरे, शिवानी बोरकर, प्रार्थना बेहरे यांच्यासारख्या कलाकारांनाही कॉमेन्ट करायचा मोह आवरला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here