मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्या ईडीच्या (ED) कोठडीत आहेत. संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं कारवाई केली आहे. संजय राऊत यांनी ईडीच्या कोठडीतून त्यांना पाठिंबा देणाऱ्या राजकीय पक्षांना पत्र लिहून संकट काळात पाठिशी राहणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांचे आभार मानले आहेत. संजय राऊत यांनी काँग्रेस (Congress) नेते मल्लिकार्जून खर्गे ( Mallikarjun Kharge) यांना लिहिलेलं पत्र माध्यमांसमोर आलं आहे. संजय राऊत यांनी पत्रात मल्लिकार्जून खर्गे यांना लिहिलेल्या पत्रात बाळासाहेब ठाकरेंनी दिलेल्या मंत्राची आठवण करुन दिली आहे.

संजय राऊतांच्या पत्रात काय?

विरोधी पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांसाठी सध्या कठिण दिवस आहेत. केंद्र सरकारकडून आणि केंद्रीय यंत्रणांकडून माझ्यावर राजकीय हेतून आणि सूडभावनेतून करण्यात आलेल्या कारवाईवेळ तुम्ही मला पाठिंबा दिलात त्याबद्दल आपला आभारी आहे, असं संजय राऊत म्हणाले. मी सुरु केलेला सत्यासाठीचा लढा कितीही दबाव टाकला तरी थांबवणार नाही. मी माघार घेणार नाही लढत राहणार आहे. वंदनीय हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी रडायचं नाही लढायचं हा मंत्र दिलेला आहे त्याप्रमाणं संघर्ष करत राहणार आहे, असंही राऊत यांनी म्हटलं.

तुम्ही मला पाठिंबा दिलात त्यामुळं मी तुमचे आभार मानत आहे. तुम्ही माझ्या अटकेविरोधात जो आवाज उठवला त्याबद्दल तुमचे आभार मानतो. तुम्ही माझ्या राजकीय पक्षासोबत आणि सहकाऱ्यांसोबत संकटकाळात संसदेत आणि संसदेबाहेर उभे राहिलात त्याबद्दल आभार मानतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

Congress Protest: प्रियांका गांधींचा भररस्त्यात ठिय्या, महागाईसह बेरोजगारीच्या मुद्यावरुन भाजप सरकारवर हल्लाबोल

वेळ आणि सहनशीलता या दोन गोष्टींना लढाईत महत्त्वपूर्ण स्थान असतं. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांची शिकवण आणि माझं कुटुंब, सहानुभूतीदार यांच्या सदिच्छांमुळं या संकटातून बाहेर पडून आपल्या देशाला महान करण्यासाठी लढत राहू, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

Asia Cup 2022: आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा या तारखेला होणार; पाहा कोणाला मिळणार संधी

संजय राऊत यांच्याकडून मित्रपक्षांचे आभार

शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत हे सध्या ईडी कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी त्यांना पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस, तृणमूल काँग्रेस या पक्षांचे आभार मानले आहेत. संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंनी रडायचं नाही लढायचं हा मंत्र दिला होता त्यानुसार वाटचाल करणार असल्याचं म्हटलं. संजय राऊत यांच्यासाठी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी ट्विट करुन बाजू मांडली होती. संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिकवणीप्रमाणं लढा सुरु ठेवणार असल्याचं म्हटलं आहे.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, आधी भारतीयांना किंमत नव्हती; रोहित पवारांनी दिले सडेतोड उत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here