Bhagyashree Rasal | Lipi | Updated: Aug 5, 2022, 5:45 PM
कधी जाळीचा तर कधी फोटोप्रिंटचा ड्रेस घालून चर्चेत रहायला आवडणाऱ्या अभिनेत्री मॉडेल उर्फी जावेदने सध्या लक्ष वेधलंय ते न्यायव्यवस्थेवर हल्लाबोल विधान करून. सायबर क्राइमवरून भडलेल्या उर्फीचा हा अवतार पाहून तिचे चाहतेही अवाक झालेत. फॅशन, स्टाइल यामध्येच रमणाऱ्या उर्फीला नेमकी झळ बसली तरी कशाची.

हायलाइट्स:
- उर्फी जावेद सायबर सेलवर भडकली
- देशातील कायदाव्यवस्थेवर विचारला तिने प्रश्न
- सायबर गुन्हेगारीबाबत कारवाईला होणाऱ्या विलंबामुळे आला राग
उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट केलीय जी खूप व्हायरल होत आहे. सायबर सेलविषयी बोलताना तिने म्हटलय की लोक आपल्या तक्रारी दाखल करत नाहीत. कारण सायबर सेल आहे की नाही अशी शंका लोकांना येत आहे. लोकांना येणाऱ्या समस्यांबाबत सायबर सेल आणि पोलिस दुर्लक्ष करतात. त्यामुळेच लोक तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. तर दुसरीकडे सायबर गुन्हेगार ऑनलाइन फसवणूक करतात, महिलांना त्रास देतात. हे सगळं सायबर सेल किंवा पोलिसांना का दिसत नाही.
एका दुसऱ्या पोस्टमध्ये लक्ष वेधत उर्फी म्हणतेय की मेरठमध्ये पाच महिन्यांपूर्वी एक घटना घडली होती. ज्यामध्ये महिला आयोगच्या अध्यक्षा सुषमा सिंह पोलिसांना धारेवर धरत असल्याचं दिसत आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षांचे सासरेच तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करत होते. महिला अध्यक्षांनीचही तक्रार दाखल केली होती, पण अजूनही याप्रकरणी कारवाई झालेली नाही.
उर्फी असंही म्ह्णतेय, की अशा केसमध्ये कारवाई तेव्हाच होते जेव्हा अशा घटना कुठल्यातरी राजकीय नेत्यांशी संबंधित व्यक्तीसोबत घडतात किंवा श्रीमंत व्यक्तींसोबत. सामान्य लोकांना न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. देशातील कायदेव्यवस्था खूप सुस्त झाल्याचंही ती म्हणतेय. सध्या उर्फी तिच्या या पोस्टमुळे चर्चेत आलीआहे. तिच्या या विधानाला नेटकऱ्यांनीही प्रतिसाद दिला आहे. समाजातील या गोष्टीकडे लक्ष वेधणाऱ्या उर्फीचं कौतुकही होत आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.