डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील डिलक्स प्लायवूडचे हिम्मत नाहर यांचे अपहरण करून आणि खून करण्याची धमकी देवून ५० लाखाची खंडणी मागणाऱ्या आरोपींना मानपाडा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने शहापूर येथून अटक केली आहे. संजय रामकिशन विश्वकर्मा (वय ३९ वर्षे, रा. डोबिवली पूर्व), संदीप ज्ञानदेव रोकडे (वय ३९ वर्षे, रा. डोबिवली पूर्व), धर्मदास अंबादास कांबळे (वय ३६ वर्षे रा. डोबिवली पूर्व), रोशन गणपत सांवत, (वय ४० वर्षे रा. डोबिवली पूर्व) अशी आरोपीची नावे आहेत. तर, इकबाल शेख हा आरोपी फरार आहे. (A businessman in Dombivli was kidnapped and a ransom of Rs 50 lakh was demanded)

डोंबिवली पूर्वेतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिलक्स प्लायवूड या दुकानाचे मालक हिम्मत शेषमल नाहर ३ ऑगस्ट रोजी त्यांच्या दुकानात असताना आरोपी संजय विश्वकर्मा याने जुन्या ओळखीने त्यांच्या दुकानात येवून ३ लाख रुपयांचे प्लायवूड खरेदी केले आणि व्यवहाराचे अ‍ॅडव्हान्स पैसे एटीएममधून काढून देतो या बहाण्याने हिम्मत नाहर यांना दुकानाचे बाहेर घेवून एटीएम कडे घेऊन गेला. त्यावेळी त्याने येथील एटीएम बंद आहे, पुढच्या एटीएममधून पैसे काढून देतो असे बोलून त्यांना एका गाडीमध्ये बसवून त्यांचा मोबाईल आरोपींनी काढून घेतला. त्यानंतर त्यांचे अपहरण करून शहापूर येथील एका खोलीत बांधून ठेवले.

तीन तारखेला रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हिम्मत नाहर यांचा पुतण्या जितू नाहर याच्या मोबाईलवर आरोपींचा फोन आला आणि त्यांनी सांगीतले की, तुमचा काका आमच्या ताब्यात आहे. तो परत पाहिजे असेल तर ५० लाख रूपये तयार ठेवा. आम्ही एका तासात पैसे कोठे जमा करायचे याबाबत कळवतो. त्यानंतर फिर्यादी हे तात्काळ ही खबर मानपाडा पोलीस स्टेशनला कळवली. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ टिम तयार करून तांत्रिक तपासाव्दारे त्यांना वेगवेगळया ठिकाणी रवाना केली.

हायप्रोफाईल खटले लढवणारे उज्ज्वल निकम एकनाथ शिंदेंच्या भेटीला, तर्कवितर्कांना उधाण
दरम्यान, आरोपींनी जितू नाहर यांना दर तासांनी फोन करून पैसे घेवून वेगवेगळ्या ठिकाणी बोलविले. त्यानंतर आरोपी यांनी जितू नाहर यांना शहापूर तालुक्यातील मुंबई-आगरा रोडवरील गोठेघर गावाचे जवळील बोगद्याचे ठिकाणी पैसे घेवून येण्यास सांगितले. त्याप्रमाणे लागलीच पोलिसांनी चार टीम तयार करण्यात येवून त्यांना शेतकरी, खाटीक असे व्यवसाय करणारे नागरिक ज्या पद्धतीचे कपडे परीधान करतात त्या पद्धतीने कपडे परिधान करून सदर ठिकाणी पाठविण्यात आले. तसेच जितू याला एक पैशांची बॅग तयार करून आरोपींना पैसे देण्यापूर्वी अपहरण करण्यात आलेल्या व्यक्तीला ताब्यात देण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

पतीपासून विभक्त झाल्याचा महिलेसोबत घडलं धक्कादायक; एकटीच राहत होती म्हणून दोघांनी…
त्याप्रमाणे त्याने पैशांची बॅग घेवून बोगदयाजवळ उभा असताना एक झायलो कार तेथे आली. त्यातील व्यक्तींनी पैशांची मागणी केली असता त्याने त्यांच्या काकांना प्रथम ताब्यात दया, मग पैसे देतो असे सांगितले. त्यांनंतर त्यांनी गावातील एका घरात त्यांना ठेवण्यात आले असल्याचे सांगितले. त्यावेळी त्याने पैशाची बॅग देण्यास नकार दिला असता त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी गाडीपुढे पोलिसांनी फिल्मी स्टाईलने गाडी आणली आणि चार बाजूंनी पोलिसांनी आपल्याकडील बंदुका घेऊन घेराव घातला आणि आरोपींना पकडले.

शिंदेंच्या फोटोला विरोध करणाऱ्या महिला शिवसैनिकावर राजद्रोहाचा गुन्हा; शाखेत फोटो लावण्यावरून झालेला वाद
त्याची चौकशी केली असता अपरहण केलेल्या हिम्मतला जवळच असलेल्या एका खोलीत ठेवल्याची माहिती दिली. त्याप्रमाणे पोलीस पथकाने आरोपीसह गावात जावून आरोपीने दाखवलेल्या घराची पाहणी केली असता, त्या घरामध्ये आणखी एक आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. तसेच अपहरण झालेल्या व्यक्ला पलंगाला दोरीने बांधून ठेवले होते. या व्यक्तीची योग्य रितीने सुटका करण्यात आली. सदर घटनास्थळावरून एक आरोपी अंधाराचा फायदा घेवून पळून गेला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here