सिंधुदुर्ग: आणि रत्नागिरी जिल्ह्यात रोखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून ज्या कोकणच्या जीवावर मोठी झाली त्याच कोकणात मुंबईकर चाकरमानी आणि गाववाले यांच्यात शिवसेनेने भांडणे लावून दिली आहेत, अशा शब्दांत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत शिवसेनेवर निशाणा साधला.

मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका वाद लावून देणारी आहे. क्वारंटाइन करण्यासाठी जागा कमी पडते म्हणून गावी जाऊ नका, असे मुख्यमंत्री सांगतात हे दुर्दैवी असल्याचे दरेकर म्हणाले. शिवसेनेचे मंत्री वाटेल त्या घोषणा करतात. परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी १० हजार एसटी बस उपलब्ध करून देऊ, असे सांगितले पण प्रत्यक्षात परराज्यातील लोकांना सोडण्यासाठीच त्या उपलब्ध केल्या आणि कोकणातील लोकांना मात्र चालत यावे लागले. हा प्रवास कोकणवासीयांच्या जीवावर बेतणारा ठरतोय, असा आरोप दरेकर यांनी केला.

यांच्या हॉस्पिटलमध्ये कोविड-१९ चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात पालकमंत्री उदय सामंत टाळाटाळ करीत आहेत. त्यातून पालकमंत्री हे फक्त राजकारण करत आहेत व जनतेची दिशाभूल करत आहेत, हे स्पष्ट होत असल्याचेही दरेकर म्हणाले. भाजपतर्फे स्वॅब मशीन घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडे एक कोटी रुपये देण्यात आले आहेत. आमदारांची तशी पत्रे दिलेली आहेत, असे नमूद करताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वॅब मशीन उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे व ती जबाबदारी माजी आमदार प्रमोद जठार यांच्यावर सोपवली आहे. येत्या आठ दिवसांत जिल्ह्यात निश्चितच स्वॅब मशीन उपलब्ध होईल, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री उदय सामंत यांनी राणे वगळून भाजपचा सिंधुदुर्ग दौरा असल्याचे म्हटले होते. त्यावर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, नारायण राणेंचे मोतीबिंदूचे ऑपरेशन असल्यामुळे या दौऱ्यात आमदार नितेश राणे सहभागी होऊ शकले नाहीत पण या गोष्टीचे पालकमंत्र्यांनी भांडवल केले आहे. आमच्यात वाद लावण्याचा पालकमंत्र्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी पालकमंत्री बेताल वक्तव्ये करत आहेत.

आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर आदी यावेळी उपस्थित होते.

मुंबईत क्वारंटाइनमध्ये जेवण घोटाळा

ज्या लोकांना मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रुग्णालयात आणि खासगी संस्थामध्ये क्वारंटाइन करून ठेवलेले आहे. तिथे त्यांना देण्यात येणाऱ्या जेवणातही मोठ्या प्रमाणावर घोटाळा करण्यात आल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here