शिरोळ्यात शेखचे जंगी स्वागत
जामिनावर सुटल्यानंतर रियाजने शिरोली प्रवेश केला. यावेळी त्याचे फटाके फोडून आणि त्याच्यावर फुले उधळून त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. या जंगी स्वागताचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. रियाज शेख हा या प्रकरणातील संशयित आयोपी आहे. तो संशयित असला तरी देखील अशा प्रकारे स्टंट करणे कितपत योग्य आहे असे म्हणत कोल्हापुरात आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे. ‘I AM BACK, KINGS KING’ असे या व्हायरल व्हिडिओत लिहिल्याचे दिसत आहे.
फसवणुकी प्रकरणी पाच जणांवर कारवाई
रियाज अल्लाबक्ष शेख (वय ४१) योगेश मधुकर कुलकर्णी (वय ५७) सागर विकास संगवई (वय ३७) व जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी(वय ५३) या आरोपांना अटक करण्यात आली होता. दौंडचे आमदार राहुल कुल आणि माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी हा डाव उधळून लावला होता. रियाज शेख हा कोल्हापूरचा असून, योगेश कुलकर्णी आणि सागर संगवई हे ठाण्याचे, तर जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी हा मुंबईतील नागपाडा येथील आहे.
राज्यात ठाकरे सरकार कोसळल्यानंतर शिंदे सरकार सत्तेत आले. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच मंत्रिपद मिळेल असे अनेक आमदारांना वाटत होते. याचाच फायदा घेत राज्यातील काही आमदारांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. जर कॅबिनेट मंत्रिपद हवे असेल तर १०० कोटी रुपये द्या, अशी मागणी करण्यात येत होती. या प्रकरणी जुलै महिन्यात कोल्हापुरात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत चौघांना अटक केली होती.