विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी येथे आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर टीका केली. त्याला पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. सामंत म्हणाले, करोना साथ आल्यानंतर ५९ दिवसांनी दरेकर यांना कोकणवासियांचा पुळका आला आहे. एवढे दिवस हे महाशय मुंबईतच होते. स्वॅब मशीनसाठी आमदारांनी पत्रे दिली असे दरेकर सांगतात ते वक्तव्य दिशाभूल करणारे आहे. खासगी कॉलेजमधील प्रयोगशाळेसाठी आमदार फंड दिला जात नाही असे सांगत यांनी दरेकर यांचे सर्व आरोप फेटाळून लावले.
दरम्यान, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात करोना रोखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. ज्या कोकणच्या जीवावर शिवसेना मोठी झाली त्याच कोकणात मुंबईकर चाकरमानी आणि गाववाले यांच्यात शिवसेनेने भांडणे लावून दिली आहेत, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कोकणबाबत घेतलेली भूमिका वाद लावून देणारी आहे. क्वारंटाइन करण्यासाठी जागा कमी पडते म्हणून गावी जाऊ नका, असे मुख्यमंत्री सांगतात हे दुर्दैवी असल्याचे दरेकर म्हणाले होते. नारायण राणे यांच्या हॉस्पिटलमध्ये कोविड-१९ चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात पालकमंत्री उदय सामंत टाळाटाळ करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला होता. या सर्व आरोपांना सामंत यांनी प्रत्युत्तर दिले.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines